घररायगडप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत सावळा गोंधळ

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत सावळा गोंधळ

Subscribe

केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत सावळा गोंधळ असल्याने शेतकर्‍यांना पैसे मिळण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेली काही दिवस इन्कम टॅक्स न भरणार्‍या शेतकर्‍यांना देखील इन्कम टॅक्स भरत असल्याचे कारण पुढे करत खात्यात पैसे येण्याचे बंद झाल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात येत आहे. याबाबत किसान क्रांती संघटना आक्रमक झाली आहे.

महाड: केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत सावळा गोंधळ असल्याने शेतकर्‍यांना पैसे मिळण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेली काही दिवस इन्कम टॅक्स न भरणार्‍या शेतकर्‍यांना देखील इन्कम टॅक्स भरत असल्याचे कारण पुढे करत खात्यात पैसे येण्याचे बंद झाल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात येत आहे. याबाबत किसान क्रांती संघटना आक्रमक झाली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र शासनाने सुरू केली असून याद्वारे शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा होत आहेत मात्र गेली काही महिन्यांमध्ये अनेक शेतकर्‍यांची नावे यातून वगळली गेली आहेत. महसूल विभागाकडून सर्वेक्षण केल्यानंतर यातील अनेक शेतकरी सरकारी खात्यातून निवृत्त झालेले तर अनेक शेतकरी इन्कम टॅक्स आणि सधन असल्याचे दिसून आले यामुळे तालुक्यातील जवळपास 300 हून अधिक शेतकर्‍यांची नावे पी एम किसान सन्मान निधी योजनेतून वगळण्यात आली आहे असे असले तरी जे लाभार्थी पात्र आहे अशा लाभार्थ्यांना देखील पैसे मिळण्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
एकट्या महाड तालुक्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेत लाभार्थी आहेत यापैकी शेतकरी यातून वगळण्यात आले आहेत मात्र पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास देखील महसूल विभागाच्या वार्‍या करावे लागत आहे अनेक शेतकर्‍यांना महसूल विभागांमध्ये उत्तर दिले जात नसल्याने शेतकरी हवालदिन झाले आहेत वारंवार फेर्‍या मारून कंटाले आहेत. पात्र लाभार्थी शेतकर्‍यांना शासनाने आता महाड पोस्ट कार्यालयात नवीन खाते काढण्यास सांगितले आहे त्यानुसार अनेक शेतकर्‍यांनी पोस्टमध्ये आपले खाते खोलले असले तरी पुन्हा पुन्हा खाते खोलण्याचे संदेश मोबाईलवर येत आहेत अशी तक्रार दासगाव येथील मनोहर शिंदे यांनी केली आहे. तर जे शेतकरी इन्कम टॅक्स ला पात्र नाही अशा शेतकर्‍यांना देखील तुम्ही इन्कम टॅक्स भरत आहात असे कारण पुढे करत त्यांना पी.एम. सन्मान निधी योजने पासून वंचित ठेवण्यात आले आहे.

समाधानकारक उत्तर दिली जात नाही
तालुक्यातील केंबुर्ली गावातील प्रकाश केळकर, रामकृष्ण बाईत, रामकृष्ण गणपत धाडवे हे तीन शेतकरी वर्षभरापूर्वी मयत असून देखील इन्कम टॅक्स भरत असल्याचे कारण सांगितले गेले आहे, तसेच अखिल घोले, उस्मान घोले, फरजाना घोले हे देखील सामान्य शेतकरी असताना टॅक्स भरत असल्याचे कारण सांगून त्यांना देखील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून पैसे अद्याप देण्यात आलेले नाही. अनेक शेतकर्‍यांनी आपले बँक खाते अपडेट केलेले नाही या कारणास्तव देखील अनेकांच्या खात्यावर पैसे मिळत नाही असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे मात्र महसूल विभागामध्ये समाधानकारक उत्तर दिली जात नाही अशी तक्रार किसान क्रांती संघटनेने केली आहे. यामुळे शेतकर्‍यांना जर न्याय दिला गेला नाही तर केंद्र शासनाच्या विरोधामध्ये महाडमध्ये निषेध व्यक्त केला जाईल असे संघटनेचे तालुकाध्यक्ष तुकाराम देशमुख यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

महाड तालुक्यात अनेक शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे पैसे गेली कांही महिन्यात आलेले नाहीत शिवाय कांही शेतकर्‍यांना इन्कम टॅक्स भरत असल्याचे कारण पुढे करून वंचित ठेवले जात आहे, याबाबत शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
– तुकाराम देशमुख,
संस्थापक, किसान क्रांती संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -