Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण हे नागोबा तिकडे मालक म्हणून बसलेत; बारसूप्रकरणी उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

हे नागोबा तिकडे मालक म्हणून बसलेत; बारसूप्रकरणी उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

Subscribe

महाड : महाड येथील चांदे क्रिडांगणावर शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर सभा आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडत आहे. यावेळी बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले की, बारसूमधील लोकांना मधाचं बोट लावून सोन्यासारख्या जमिनी घेतल्या. प्रकल्प येणार हे तुम्हाला माहित होते. आता हे नागोबा तिकडे मालक म्हणून बसलेत,” असे वक्तव्य करत उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आज मी बारसूत गेलेलो, त्या ठिकाणी माझं पत्र दाखवत होते. हो मी पत्र दिलं होतं, मला खोटं बोलता येत नाही. खोटं बोलण्याची गरज नाही, कारण मी पाप केलं नाही. यावेळी त्यांनी एक कागद दाखवताना म्हटले की, गद्दार उपऱ्यांच्या सुपाऱ्या घेऊन नाचतायत. यादीत उपऱ्यांची नावं आहेत. बारसू येथील लोकांना मधाचं बोट लावून सोन्यासारख्या जमिनी घेतल्या. प्रकल्प येणार हे तुम्हाला माहित होते. आता हे नागोबा तिकडे मालक म्हणून बसलेत,” असे वक्तव्य करत उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला.

- Advertisement -

ते म्हणाले की, नाणारमध्ये आम्ही रिफायनरी होऊ दिली नाही. नंतर मला दिल्लीतून फोन आले. तिकडे गेलेले गद्दार माझ्याकडे यायचे, मोठा प्रकल्प आहे. जर विनाशकारी प्रकल्प असेल तर गुजरातला जाऊ द्या, असे मी त्यांना सांगितले. तिकडे कोणाचा विरोध नाही, वस्त्या गाव नाही, ओसाड जमीन असल्यामुळे माझ्याकडून पत्र देण्यात आले. आता एकंदरीत पाहिले तर तिकडून संमती आली आणि आपलं सरकार पाडलं गेलं, असे त्यांनी सांगितले. मी त्यावेळी सांगितले होते की, मी बारसूला जाईल, लोकांशी बोलेन, कंपनीला प्रेझेंटेशन द्यायला सांगेन, लोकांनी हो म्हटलं तर प्रकल्प येईल, नाही म्हटलं तर बाहेरचा रस्ता, हे सांगितलं जात नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.

भगव्याला कलंक लावण्याची कोणाची हिंमत नाही
महाड मतदारसंघ आपला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भगव्याला कलंक लावण्याची कोणाची हिंमत नाही. इकडे जशी मतं आहेत तशी पवित्र मातीही आहेत. यात राजकारणात गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

 

- Advertisment -