घररायगडमुरुडमध्ये कोळी समाजाचे ठिय्या आंदोलन; मुख्याधिकारी यांच्या पत्रानंतरआंदोलनाची सांगता

मुरुडमध्ये कोळी समाजाचे ठिय्या आंदोलन; मुख्याधिकारी यांच्या पत्रानंतरआंदोलनाची सांगता

Subscribe

शहरातील जुना पाडा महादेव कोळी समाज मुरुड सिटी सर्वे नंबर ६५/२ या कोळी लोकांचे बिन आकारी होळीचे मैदान असून येथे येथील नगरपरिषदेचे गटाराचे बांधकाम सुरु असतानाच काळ भैरव देवस्थान मंदिर ट्रस्ट भंडारी समाज मुरुड यांनी गटाराच्या मूळ बांधकामात अनधिकृतपणे लोखंडी खांब उभे केले आहेत. त्यामुळे मुरुड भंडारी समाजाने त्यांचा कोणताही संबंध नसताना आमच्या समाजाच्या होळीच्या ठिकाणाला सीमांकित करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुरुड: शहरातील जुना पाडा महादेव कोळी समाज मुरुड सिटी सर्वे नंबर ६५/२ या कोळी लोकांचे बिन आकारी होळीचे मैदान असून येथे येथील नगरपरिषदेचे गटाराचे बांधकाम सुरु असतानाच काळ भैरव देवस्थान मंदिर ट्रस्ट भंडारी समाज मुरुड यांनी गटाराच्या मूळ बांधकामात अनधिकृतपणे लोखंडी खांब उभे केले आहेत. त्यामुळे मुरुड भंडारी समाजाने त्यांचा कोणताही संबंध नसताना आमच्या समाजाच्या होळीच्या ठिकाणाला सीमांकित करण्याचा प्रयत्न केला आहे.सदरील लोखंडी पोल तातडीने काढून टाकण्याची मागणी कोळी समाजाने केली होती. नगरपरिषदकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर नियोजित इशार्‍याप्रमाणे गुरुवारी कोळी समाजाने नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी समाजाच्या असंख्य महिला आणि पुरुष सहभागी झाले होते.
सदरचा मोर्चा कोळी समाज मंदिर येथून सुरु होऊन होळी च्या मैदानाला श्रीफळ वाढवून बाजारपेठ मार्गे मुरुड नगरपरिषदेवर मोर्चा धडकला. यावेळी कोळी समाजातील लोकांनी ‘आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे’, लोखंडी पोल काढलेच पाहिजे, कोळी समाजाचा एकजुटीचा विजय असो असे फलक हातात घेण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक पांडुरंग आरेकर,श्याम चोरढेकर,नवा पाडा समाज अध्यक्ष यशवंत सवाई,उपाध्यक्ष ऋषिकेश बैले,मनोहर बैले,आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी कोळी समाजाच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी त्यांच्या कक्षात बोलावत सदर जागेची मूळ मालकी ही सरकारी असल्याने सदरचा विषय हा महसूल खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने सदरचा अहवाल महसूल विभागास देऊन त्यानंतर सदरची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे सांगितले. कोळी समाजाची मागणी पोल काढावे तर भंडारी समाजाची मागणी आहे की पोल काढण्यात येऊ नये. यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस विभागामार्फत जागेच्या मूळ मालकी विभाग म्हणजेच महसूल विभागास सादर करण्याची कार्यवाही नगरपरिषदेकडून करण्यात येणार आहे.
पोलीस विभाग व महसूल विभागाकडून कार्यवाही होऊन महसूल विभागाने मूळ जागा मालक या भूमिकेतून आदेशित केल्यावर सदरचे पोल तात्काळ काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र कोळी समाजास दिल्याने यावर या समाजाचे समाधान झाल्याने सदरच्या ठिय्या आंदोलनाची सांगता करण्यात आली. सदरचा प्रश्न आता महसूल दप्तरी गेला आहे.यावर निर्णय होताच पोल काढण्याची प्रक्रिया होणार आहे.

तहसीलदार आणि नगरपरिषद लावलेले लोखंडी पोल हे बेकायदेशीर आसल्याचे मान्य करतात परंतु कार्यवाही करीत नाहीत.सदरची जमीन सरकारी असेल तर मग भंडारी समाजाला लोखंडी पोल लावण्याचा अधिकार कोणी दिला?, २०२० सालापासून आम्ही निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आज आम्हाला ठिय्या आंदोलन करावे लागत आहे.भंडारी समाजाने प्रामाणिकपणे पोल काढावे.
– उषा बोरजी,
महिला अध्यक्ष, कोळी समाज

- Advertisement -

ठेकेदारावर कारवाईची मागणी
पूर्वापार कोळी समाजाची होळी लावण्याचे ठिकाण आहे.भंडारी समाजाने पोल लावल्याने हा वाद उत्पन्न झाला आहे.सदरची जागा खुली होती त्यावेळी वाद नव्हता परंतु लोखण्डी पोल बसवल्याने जागा सीमांकित करून आमचा हक्क हिरवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही विरोध करणारच, असे गाव पाटील राजेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले. तर नगरपरिषदेने गटाराचे बांधकाम दिले असताना लोखंडी पोल बसवणार्‍या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी समाज अध्यक्ष पुरुषोत्तम नांदगावकर यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -