घररायगडखालापुरात १९ दिवसांत रुग्णसंख्या हजारी पार

खालापुरात १९ दिवसांत रुग्णसंख्या हजारी पार

Subscribe

कोरोना विषाणूची दुसरी लाटही खालापुरकरांचा पिच्छा सोडण्यास तयार नसून अवघ्या १९ दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या १ हजार २२ च्या घरात पोहोचली. तर २५ पेक्षा अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे.

कोरोना विषाणूची दुसरी लाटही खालापुरकरांचा पिच्छा सोडण्यास तयार नसून अवघ्या १९ दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या १ हजार २२ च्या घरात पोहोचली. तर २५ पेक्षा अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. सर्व प्रकारचे निर्बंध, जनता कर्फ्यू आणि लसीकरणाला वेग आला असताना देखील कोरोना संसर्गाने पहिल्या लाटेतील सर्व आकडेवारी मागे टाकले आहे. मार्च महिन्यात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण आणि एप्रिलमध्ये झालेली वाढ यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. दररोज ६० ते १०० रुग्ण सापडत असल्याने आकडा ४ हजार ३५८ च्या घरात पोहोचला आहे. हा वेग असाच कायम राहिल्यास कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास प्रशासनाला जड जाणार असून, तालुका हॉटस्पॉट घोषित करून कडक लॉकडाऊन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

१ एप्रिल २०२१ ची आकडेवारी

- Advertisement -
  • एकूण कोरोनाबाधित – ३३४८
  • बरे झालेले रुग्ण – ३ हजार ४८
  • मृत – १२८

१९ एप्रिल २०२१ ची आकडेवारी

  • एकूण कोरोनाबाधित – ४३५८

मृतांचा आकडा तालुका अहवालानुसार जास्त असून, जिल्हा आकडेवारीत केवळ ३ ने वाढ दाखविण्यात आली होती. प्रत्यक्षात चौक मंडळ विभागातच १३ मृत्यू झाले असून, खोपोली नगर परिषद आणि खालापूरच्या उर्वरित भागात देखील १५ पेक्षा अधिक मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. परंतु जिल्हा आकडेवारीत तफावत आहे.

- Advertisement -

मृत्यूच्या आकडेवारीत संभ्रम असल्यास त्याबाबत आरोग्य विभागाकडून माहिती घेऊन नव्याने अहवाल जिल्ह्याकडे पाठविण्यात येईल.
– ईरेश चप्पलवार, तहसीलदार, खालापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -