Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर रायगड मुरुडमध्ये पर्यटकांचा ओघ; वाढत्या तापमानामुळे पर्यटक हैराण 

मुरुडमध्ये पर्यटकांचा ओघ; वाढत्या तापमानामुळे पर्यटक हैराण 

Subscribe

जिल्ह्यात पर्यटकांच संख्या वाढती असली तरी मुरूड तालुक्यातील तापमानाचा पारा शनिवार, रविवारसह सोमवारीही उष्णतेचा पारा ३७ पर्यंत पोहचल्याने सकाळी ११ वाजता बाहेर पडणे स्थानिकांनाही मुश्किल झालेले दिसून आले. त्यामुळे तालुक्यातील मुख्य बाजार पेठातील वर्दळ थंडावली आहे. उन्हाळी सुट्टी असल्याने मुरुडसह विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा ओघ असला तरी त्यांना वाढत्या तापमानाला तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे काही पर्यटकांनी वातनाकुलीत लॉजिंगमध्ये राहणेही पसंत केल्याचे दिसून येते तर काही जण वाढत्या तापमानामुळे शरीराची होणारी काहिली समुद्रात पोहून शमवित असल्याचेही दृश्य मुरूडसह नांदगाव, काशीद,सर्वे आदी समुद्रकिनार्‍यावर दिसून येत आहे.

नांदगाव: जिल्ह्यात पर्यटकांच संख्या वाढती असली तरी मुरूड तालुक्यातील तापमानाचा पारा शनिवार, रविवारसह सोमवारीही उष्णतेचा पारा ३७ पर्यंत पोहचल्याने सकाळी ११ वाजता बाहेर पडणे स्थानिकांनाही मुश्किल झालेले दिसून आले. त्यामुळे तालुक्यातील मुख्य बाजार पेठातील वर्दळ थंडावली आहे. उन्हाळी सुट्टी असल्याने मुरुडसह विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा ओघ असला तरी त्यांना वाढत्या तापमानाला तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे काही पर्यटकांनी वातनाकुलीत लॉजिंगमध्ये राहणेही पसंत केल्याचे दिसून येते तर काही जण वाढत्या तापमानामुळे शरीराची होणारी काहिली समुद्रात पोहून शमवित असल्याचेही दृश्य मुरूडसह नांदगाव, काशीद,सर्वे आदी समुद्रकिनार्‍यावर दिसून येत आहे.
पर्यटकांमुळे सर्वच ठिकाणी स्टॉल्स, हॉटेल्स, लॉजिंग व्यवस्था जवळजवळ फुल्ल असल्याचे दिसत होते. मुरूड नगरपरिषदेने समुद्र किनारी विश्रामबाग गार्डनचे नूतनीकरण करून सौंदर्यीकरणात भर घातल्याने पर्यटक सुखावले आहेत.जंजिर्‍राकडे जाणार्‍या मासळी मार्केट मार्गावर नेहमीप्रमाणे वाहनांची कोंडी होत होती. रविवारी दुपारी १२ वाजता समुद्रकिनारी उष्ण वारे वाहत असल्याने अनेक पर्यटक थेट समुद्रात डुबकी मारताना दिसत होते.समुद्रात डुबकी मारल्याने त्वचा रोग, उष्णतेची काहिली कमी होते असे मत पुण्याहून आलेले पर्यटक दांपत्य शेखर देशमुख, शुभांगी देशमुख यांनी व्यक्त केले. मुरूड ,राजपूरी, खोरा जेट्टीवर पर्यटकांची सुमारे ५०० ते ७०० वाहने आल्याचे दिसत होते.

 पर्यटकांमुळे व्यसाये तेजीत
पर्यटनासाठी आलेले अनेक जण मुरूड समुद्रकिनारी हापूस आंबे खरेदीसाठी सरसावल्याचे दिसून आले तसेच सुकी मासळी खरेदीसाठीही पर्यटकांची वर्दळ होती.येथे पक्क्या हापूस आंब्याचा डझनाचा दर पाचशे रुपये इतका असल्याचे दिसले. राजपुरी जेट्टीवरही पर्यटकांची जंजिर्‍यात जाण्यासाठी मोठी गर्दी होती. थंड पेये, खाद्यपदार्थ, खेळणी, टोप्या विक्री करणारे, हॉटेल्स चालक, ऑटो चालक, शहाळी विक्री दुकानदार यांचा धंदा तेजीने वधारला असल्याचे दिसत होते.

- Advertisement -

मुरूडमध्ये ५०० वाहने दाखल झाली आहेत.जंजिर्‍यावर पर्यटकांची मोठी मांदियाळी दिसत होती.मुरूडची ग्रामदेवता श्री कोटेश्वरी देवी, श्री दत्त मंदिर मुरूड, नांदगाव येथील श्री सिद्धिविनायक देवस्थान, साळाव येथील बिर्ला गणेश मंदिर, खोरा बंदर परिसरातील डोंगरी गावची श्री कालिका माता देवस्थान आदी धार्मिक स्थळी देखील पर्यटक भेटी देताना दिसून आले.
– मितेश माळी,
कर्मचारी, मुरूड टोल नाका

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -