तौत्केतील विशेष सवलत बंद ,जिल्ह्यातील सर्व दुकाने दुपारी 2 पर्यंतच सुरू राहाणार

less response to 'Bharat Bandh' in Thane

कोरोनामुळे घालण्यात आलेले निर्बंध रायगड जिल्ह्यात काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. आता सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु ही दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या कालावधीतच सुरू राहणर असून, त्याचवेळी तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेली विशेष सवलत बंद करण्यात आली आहे.

कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यात काही निर्बंध घालण्यात आले होते. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 11 या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. 1 जूनपासून काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. 1 जूनपासून सर्व दुकाने उघडण्यात परवानगी देण्यात आली आहे. ही दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या कालावधीतच सुरू ठेवता येतील. तौक्तेनंतर अत्यावश्यक वस्तूंची दुकाने, तसेच ताडपात्री, हार्डवेअर, पत्रे, तसेच कृषी विषयक वस्तूंची विक्री करणारी दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. ही सूट नवीन आदेशानुसार बंद करण्यात आली आहे. आता ही दुकाने देखील सकाळी 7 ते दुपारी 2 या कालावधीतच सुरू ठेवता येणार आहे.

ई-कॉमर्स व्यवसाय सकाळी 7 ते सायंकाळी 7 या कालावधीत सुरू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील उपस्थिती आता 25 टक्के करण्यात आली आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर वैद्यकीय कारणे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडण्यास निर्बंध राहतील. दुकानांमधील मालवाहतूक करण्यास निर्बंध राहणार नाहीत. मात्र दुपारनंतर माल विक्रीस निर्बंध राहणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौेधरी यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.