घररायगडअतिक्रमणांमुळे म्हसळेत वाहतूक कोंडी; वाहतूक पोलिसांची नेहमीच आवश्यकता

अतिक्रमणांमुळे म्हसळेत वाहतूक कोंडी; वाहतूक पोलिसांची नेहमीच आवश्यकता

Subscribe

शहरातील काही भागात झालेली अनधिकृत बांधकामे, मोकळ्या जागा आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे, फेरीवाले तसेच रस्त्याच्या दुतर्फा होणारी अनधिकृत पार्कींग आणि पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात वाहतूक सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या सर्व प्रकारांत पोलीस प्रशासनाची व्यवस्था पूर्णपणे कोलमडत असल्याचे स्थानिकांचे मत असून या प्रशासनाने काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे अपेक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

म्हसळे: शहरातील काही भागात झालेली अनधिकृत बांधकामे, मोकळ्या जागा आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे, फेरीवाले तसेच रस्त्याच्या दुतर्फा होणारी अनधिकृत पार्कींग आणि पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात वाहतूक सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या सर्व प्रकारांत पोलीस प्रशासनाची व्यवस्था पूर्णपणे कोलमडत असल्याचे स्थानिकांचे मत असून या प्रशासनाने काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे अपेक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
शहरातील रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्कींग आणि पर्यटकांच्या संख्येमुळे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. शनिवारी वीकएन्डमुळे पर्यटक आणि रमजान सुरु झाल्यामुळे ग्राहकांची बाजारात होणारी रेलचेल तसेच दिघी नाका ते पाभरे फाटा या अंतरात केवळ एक होमगार्ड रस्त्यावरीळ वाहतूक कोंडी सोडवित असल्याचे दिसून येत होते. मात्र मोठ्या प्रमाणातील वाहनांची झालेली वाहतूक कोंडीचे आणि ती सोडविण्याचा प्रयत्न करणारा एकमेव होमगार्ड यामुळे वाहतूक कोंडीचा गुंता सुटणे अवघड बनल्याचे आणि वाहन चालकांबरोबर पादचार्‍यांनाही कमालिचा त्राष सहन करावा लागत असल्याचे त्यावेळी दिसून आले.
शहरातील पाभरे फाटा ते दिघी नाका हा सुमारे ६०० मीटरचा महत्वाचा टप्पा आहे. याच परिसरांत दोन वाहतूक पोलीस कार्यरत असावे असे असताना केवळ एक होमगार्ड देऊन पोलीस प्रशासन ‘ट्रॅफीक जॅम’करते का, असा प्रश्न स्थानिकांकडून केला जात आहे. या प्रकारामुळे शहरातील अंर्तगत रस्त्यांपैकी पोलीस स्टेशन, ब्राह्मण आळी, दातार आळी, साने मोहल्ला तसेच काजी मोहल्ला, मोमीन पुरा या अंर्तगत रस्त्यांवरही अनेक वेळा ट्रॅफीक जॅम तथा वाहतूक कोंडीची समस्या मान वर काढू लागल्याचे चित्र आहे.

रस्त्यावरून चालणेही ठरते अडचणीचे
पाभरे फाटा ते दिघी नाका ह्या शहरातील ट्रॅफीक जॅमच्या मुख्य टप्प्यात अरूंद रस्ता, दोन्ही बाजूने उंच इमारती, तालुक्यातील ८४ गावांमधील कारभार पाहणारी महत्वाची प्रशासकीय कार्यालये, नगरपंचायत कार्यालय, बँका अशी महत्वाची वर्दळ असणारी कार्यालये , मुख्य रस्त्यालगत दोनही बाजूने उभी असणार्‍या रिक्षा, मोटर सायकल आणिअन्य वाहने बेशिस्तपणे लावलेली असतात, जुन्या आणि नव्याने बांधण्यात येणार्‍या इमारती रस्त्यापर्यंत बांधलेल्या असल्याने या पट्टयांत सातत्याने ‘ट्रॅफिक जाम’ होत असते. यावेळी स्थानिक बाजारहाटीसाठी आलेले पादचारी, महिला यांना रस्त्यावरून चालणेही अडचणीचे होत असते.

- Advertisement -

पोलीस प्रशासनाकडून जनतेच्या अपेक्षा
सोमवार ते शुक्रवारपर्यंत असणारे वाहतूक पोलीस बर्‍याचदा शनिवार, रविवारी नसतात. मात्र शहराकडे येणारी पर्यटकांची वाढती संख्या पाहता याच दिवशी पोलिसांनी आपली कुमक वाढविणे गरजेचे आहे. तसेच नगर पंचायत, पोलिसांची वाहतूक शाखा आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमांतून शहरांत पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे. शहरांतर्गत रस्त्यांचा निकष ठरवणे आणि त्या दृष्टीने दुचाकी, तीन चाकी वाहनांशाठी वापर करणे. श्रीवर्धन, दिघीसाठी म्हसळे शहराला असणारा पर्यायी रस्ता प्राधान्याने दुरुस्त अथवा नवीन करणे. नगरपंचायतीने व्यापारी संकुल किंवा मुख्य रस्त्यालगत इमारतीचे नव्याने बांधकाम करताना पार्कींग सुविधे बाबत सक्तीचे करणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -