घररायगडसुधागड तहसीलदारांची बदली थांबवा, आदिवासींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सुधागड तहसीलदारांची बदली थांबवा, आदिवासींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Subscribe

सुधागड तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. गेले तीन वर्ष तालुक्याचा सर्वांगीण विकास तहसीलदारांनी केला आहे. आदिवासी बांधव व सर्वसामान्यांना तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांची दारे उघडी करून बर्‍याचशा योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

सुधागड तालुक्यात आदिवासी बांधवांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणारे तहसीलदार दिलीप रायण्णावार यांची आगामी काळात होणारी प्रशासकीय बदली थांबून ते सुधागड तालुक्यातच राहावेत यासाठी सुधागड तालुक्यातील आदिवासी बांधवांनी नुकतेच रायगड जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले की, सुधागड तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. गेले तीन वर्ष तालुक्याचा सर्वांगीण विकास तहसीलदारांनी केला आहे. आदिवासी बांधव व सर्वसामान्यांना तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांची दारे उघडी करून बर्‍याचशा योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. प्रशासकीय कार्यालयात जाण्यासाठी घाबरणारा ठाकूर व कातकरी समाज तहसीलदारांमुळे सर्व शासकीय कार्यालयात निसंकोच जाऊ लागला आहे. त्यांची कामे देखील सहजतेने होत आहेत. आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी तहसीलदारांनी बरेचसे उपक्रम हाती घेतले आहेत.

- Advertisement -

वेगवेगळ्या संस्थांचा सहभाग घेऊन तालुक्याचा विकास केला आहे. त्यांनी हाती घेतलेले उपक्रम पूर्णत्वास येण्यासाठी व सातत्याने सुरू राहण्यासाठी तहसीलदार या तालुक्यात राहणे गरजेचे आहे. असे म्हणणे कातकरी व ठाकूर समाजाचे अध्यक्ष व सर्व आदिवासी बांधवांचे आहे. निवेदन देतेवेळी कातकरी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, ठाकूर समाजाचे अध्यक्ष यशवंत हंबीर, उपाध्यक्ष विश्वास भोई, राजू बांगारे, आदिवासी नेते रमेश पवार, दगडू वाघमारे, कृष्णा वाघमारे, दशरथ वालेकर व लक्ष्मण पवार हे उपस्थित होते. सदर निवेदन निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर पद्मश्री बैनाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -