घररायगडसायन- पनवेल मार्गावर गांजाची विक्री करताना दोघांना अटक; सव्वा लाख रुपये किंमतीचा...

सायन- पनवेल मार्गावर गांजाची विक्री करताना दोघांना अटक; सव्वा लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त

Subscribe

हे दोघेजण सायन-पनवेल मार्गावर तळोजा फाटा येथे स्विफ्ट कारमधून गांजाची विक्री करत होते.

सायन-पनवेल मार्गावर गांजा विक्री करताना ​दोन जणांना कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेजण सायन-पनवेल मार्गावर तळोजा फाटा येथे स्विफ्ट कारमधून गांजाची विक्री करत होते. विजय मधुकर श्रीरामे आणि मिलिंद बाळू कावरे, अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेला सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचा १० किलो ६०० ग्रॅम वजनाचा गांजा व ४ लाख रुपये किंमतीची स्विफ्ट कार जप्त केली आहे. सायन-पनवेल मार्गावरील पुरुषार्थ पेट्रोल पंपाजवळ दोन व्यक्ती कुर्डवाडी येथून स्विफ्ट कारने सोमवारी पहाटेच्या सुमारास गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती कळंबोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी काळे व त्यांच्या पथकाने रविवारी मध्यरात्रीपासून पुरुषार्थ पेट्रोल पंपाजवळ सापळा लावला होता. त्यानंतर पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून दोन व्यक्ती उतरुन संशयास्पदरित्या उभे राहिले. त्या भागात दबा धरुन बसलेल्या पोलिसांच्या पथकाने दोघांची धरपकड केली.

त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासणीत विजय श्रीरामे याच्याजवळ असलेल्या गोणीमध्ये सुटा हिरवट पाने, फळे,फुले, काड्या, बिया असा सलंग्न असलेला ओसलर उग्र वासाचा १० किलो ६०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी विजय आणि मिलिंद या दोघांना एनडीपीएस कलमाखाली अटक करुन स्विफ्ट कारसह ५ लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – उद्या शरद पवार – ममता बॅनर्जी यांची भेट होणार; दिल्लीत विरोधकांची मोठी बैठक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -