पोलादपूर: मुंबई -गोवा मार्गावरील कशेडी घाटात अपघाता च्या घटनांचे सत्र सूरूअसून मंगळवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास पोलादपूरपासून आठ किलोमीटरवरीळ भोगाव गावाच्या हद्दीत दोन कार समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले. सर्व जखमींना जगद्गुरू नरेंद्रनाथस्वामी संस्थानच्या रुग्णवाहीकेतून पोलादपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कशेडी टॉप वाहतुक पोलीस शाखा मदत केंद्राचे अंमलदार ए. एस.आय. यशवंत बोडकर यांनी दिली. चालक संतोष किसन गवारी (४४,कसारा, जि. ठाणे) हे इर्टिगा कारने रत्नागिरीकडून मुंबईकडे निघाले होते, त्यावेळी त्यांचे समवेत विनिता विजय सावंत (४५)अद्धिका अदित्य सावंत (२६) आणि अदित्य किसन सावंत (२५, कसारा) या चार जणांना घेऊन मुंबई दिशेने निघाले होते. त्यांची इर्टिगा कार कशेडी घाटात भोगाव गावच्या हद्दीत आल्यावर मुंबई बाजूकडून रत्नागिरीकडे जाणार्या वॅगनर कारची समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला. वॅगनर कारमध्ये चालक साक्षी संजय पवार (२५) आणि गौरव गणेश विदरकर ( ४० ,पुणे) हे होते. अपघातात दोन्ही कारमधील एकूण सहा जण जखमी झाले आहेत.
कशेडी घाटात दोन कार एकमेकांवर धडकल्या ६ जखमी
मुंबई -गोवा मार्गावरील कशेडी घाटात अपघाता च्या घटनांचे सत्र सूरूअसून मंगळवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास पोलादपूरपासून आठ किलोमीटरवरीळ भोगाव गावाच्या हद्दीत दोन कार समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले. सर्व जखमींना जगद्गुरू नरेंद्रनाथस्वामी संस्थानच्या रुग्णवाहीकेतून पोलादपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कशेडी टॉप वाहतुक पोलीस शाखा मदत केंद्राचे अंमलदार ए. एस.आय. यशवंत बोडकर यांनी दिली.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -