घररायगडभाजपाची तोडा, फोडा इंग्रजा सारखी निती-उध्दव ठाकरे

भाजपाची तोडा, फोडा इंग्रजा सारखी निती-उध्दव ठाकरे

Subscribe

पनवेल- भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी (Udhav Balasaheb Thackeray Shiv Sena party chief Udhav Thackeray) चौल येथे झालेल्या कोकण दौर्‍यातील रायगड जिल्हयात झालेल्या पहिल्याच जनसंवाद सभेत खरपूस समाचार घेतला. तोडा फोडा राज्य करा, अशी ज्या प्रमाणे इंग्रजांनी निती वापरली तिच निती सध्या भाजपा देशात वापरत आहेत, अशी टिका उध्दव ठाकरे यांनी केली. सध्या झळकणार्‍या मोदी सरकारच्या जाहिरात बाजीवर कडाडत उध्दव ठाकरे यांनी जनतेला योजनांची टोपी घालून फसवणूक होत असून प्रत्यक्षात या योजनांचा लाभ नेमका कुणाला मिळाला आहे, दोन कोटी तरुणांना रोजगार मिळाला का? असा सवाल विचारला आहे.

उध्दव ठाकरे दोन दिवसीय कोकण दौर्‍यावर आले आहेत. दौर्‍या प्रसंगी शिवसैनिक आणि नागरिकांशी जनसंवाद सभेत मार्गदर्शन करत आहे.

- Advertisement -

चौल येथे झालेल्यासभेत उध्दव ठाकरे यांनी केंद्रातील भाजपा प्रणित मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टिकास्त्र सोडले. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळया विषयी टिका करताना ज्यावेळी बाबरी पाडली त्यात शिवसैनिकच होते असे सांगत हिंदूरुद्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर निर्माणाची सर्व प्रथम हाक दिली. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. राम मंदिराला विरोध नाही परंतु राम मंदिराच्या नावावर जो भाजपाचे प्रसिध्दीचा दिखावा सुरु केला आहे. दोन कोटी तरुणांना रोजगार देणार होते, असे म्हणार्‍या मोदींनी किती जणांना रोजगार दिला, याचा खुलासा करण्याचे आवाहन ठाकरेंनी थेट दिले. आमचा राम रुदयात आहे. रुदयात राम हाताला काम देणारे हिंदूत्व पाहिजे हेच आम्ही देऊ असे सांगत देशात परिवर्तन घडवा असे आवाहन उपस्थितांना केले.
ज्या प्रमाणे जादूगार जादू करताना टोपलीतून जादू करुन कबूतर काढून त्याला बाहेर काढतो त्याप्रमाणे मोदी सध्या योजनांची बरसात करत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ज्या प्रमाणे मतदारांना मोदी-भाजपा विसरुन जातात. त्या प्रमाणे मोदींना योजनांचा विसर पडतो. सर्व सामान्यांना योजनांची टोपी घालून फसवणुक करणार्‍यांना आणि त्यांना पाठबळ देणार्‍या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ, असे ठाकरे म्हणाले.

फडणवीस पाव उपमुख्यमंत्री
राज्याचे मुख्यमंत्री पद भुषविणारे देवेंद्र फडणवीस यांना मात्र सध्या पाव कोर प्रमाणे उपमुख्यमंत्री पदाचा वाटा मिळाला आहे, अशी टिका करत शिखर बँक घोटाळयातील आरोपी अजित पवारांना भाजपाने चक्क क्लिन चिट दिली आहे. तर दुसरीकडे भाजपाने ईडाला हाताशी कारवाईचे सत्र विरोधकांवर सुरु केल्याचे ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -