घररायगडरायगडमधून मोदी विरोधात त्सुनामीसारखे मतदान होणार-उद्धव ठाकरे

रायगडमधून मोदी विरोधात त्सुनामीसारखे मतदान होणार-उद्धव ठाकरे

Subscribe

आपण मुख्यमंत्री आसताना तोक्ते, निसर्ग वादळात शेतकर्‍यांना मदत केली, मात्र संकट आले असताना पंतप्रधान तेव्हा फिरकले नाहीत, याची आठवण करून देताना पंतप्रधान आता महाराष्टाच्या वार्‍या करत असल्याचे टीकास्त्र ठाकारे यांनी सोडले. मत पाहिजे तेव्हा मेरे प्यारे देशवासीयो, नंतर मात्र चिरडून टाकायचे, अशी कोपरखळीही त्यांनी लगावली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडलेल्या अर्थसंकल्प शेवटचा असल्याची भविष्यवाणी त्यांनी केली.

पेण -: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रायगडमध्ये जास्त प्रचार करण्याची गरज असल्याचे वाटत नाही. कारण गेल्या वेळी इतकं करून सुद्धा रायगड ताठ मानेने नरेंद्र मोदींविरोधात उभा राहिला होता. आता तर मोदी लाटेच्या विरोधात रायगडमध्ये त्सुनामीसारखे मतदान होणार ( Udhav Thackeray will vote like a tsunami from Raigad against Modi) असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील जनसवांद मेळाव्यात केले.

या मेळाव्याला पक्षाचे नेते सुभाष देसाई, अनंत गीते, माजी आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हा संर्पकप्रमुख विष्णू पाटील, संपर्क प्रमुख बबन पाटील, सह संर्पक प्रमुख किशोर जैन, तालुकाप्रमुख जगदिश ठाकूर, युवासेना तालुका अधिकारी राकेश मोकल, नरेश गांवड, अविनाश म्हात्रे, शिशिर धारकर, कमलाकर पाटील, शेकापक्षाचे महादेव दिवेकर, स्मिता पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा देणार्‍यांना बिहारचे नितीश कुमार का लागतात, असा सवाल ठाकरे यांनी केला. आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांवर सूडबुद्धीने होत असलेल्या कारवाईचा समाचार घेताना एका मराठी वर्तमानपत्रात गुरुवारी छापून आलेल्या झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीन चिट, या दोन बातम्यांचा उल्लेख केला. जो सोबत येईल तो क्लीन आणि जो विरोधात असेल त्याला अटक अशी रणनीती भाजपची असल्याचे ठाकरे म्हणाले. रायगडमधून जो निवडून आला तो मोदी लाटेत वाहून गेला, पण रायगड तसाच असल्याचे सांगत ठाकरे यांनी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता निशाणा साधला.

- Advertisement -

राम मंदिर भाजपाची प्रॉपर्टी नाही
राम मंदिर झाले याचा आनंद आहे. मात्र श्रीराम हा मोदी, भाजपची प्रॉपर्टी नसून तो सार्‍या भक्तांचा असल्याचा टोला लगावला. लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी आताची लढाई असून, देशाचे संविधान आपल्याला वाचवायचे असल्याचे ठाकरे म्हणाले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -