घररायगडतटकरेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

तटकरेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

Subscribe

२ फेब्रुवारी रोजी म्हसळेत दुपारी ३ वाजता जाहीर सभा

म्हसळे-:  रायगडचे खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघातील म्हसळे तालुक्यात २ फेब्रुवारी रोजी शिवसेना (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. (Udhav Thackeray’s cannon will explode in the fort of Tatkare) राष्ट्रवादीच्या तटकरेंच्या रणभुमित ठाकरे आपल्या शैलीत कुणावर फटकारे मारणार हे पाहण्यासाठी संपुर्ण रायगड उत्सुक झाले आहेत.

जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्वच आमदारांनी पक्षांतर केल्याने सेनेत मोठे राजकीय स्थित्यंतर घडून आले आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गट नव्या जोमाने कामाला लागला आहे. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिल्हयातील शिवसैनिकांसोबत संवाद साधण्यासाठी १ आणि २ फेब्रुवारी रोजी रायगड दौर्‍यावर येणार आहेत.

- Advertisement -

२ फेब्रुवारी रोजी म्हसळे शहरात दुपारी ३ वाजता उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी पत्रकार परिषदे दिली. यामुळे या सभेची जनतेत उत्सुकता आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍याची माहिती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विभागवार बैठका आयोजित करण्यात येत आहेत. सभेमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला आहे. आयोजित सभेची शिवसैनिकांनी जय्यत तयारी सुरू केली असून, प्रत्येक गावागावातून, वाडी वस्त्यांमधून शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे नवगणे यांनी सांगितले.

यावेळी उप जिल्हाप्रमुख नंदू शिर्के, तालुकाप्रमुख सुरेश कुडेकर, संपर्कप्रमुख गजानन शिंदे, बाळा म्हात्रे, दीपल शिर्के, अमित महामुणकर, शौकत हजवाने आदी शिवसैनिक उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -