पोलादपूर तालुक्यात अघोषीत पाणीबाणी; उष्मा, पाणीप्रश्नामुळे चाकरमान्यांची पाठ

बच्चेकंपनीला शाळेच्या सुट्टया पडल्या आहेत, त्यात नातेवाईकांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. त्यामुळे शहरात नोकरी व्यवसायामुळे असलेला चाकरमानी आपल्या कुटुंबासह गावीजाण्याचा बेत करत आहे. मात्र असे असले तरी आंबे, फणस, काजू, करवंदाचा आस्वाद घेण्यासाठी नदी पात्रातील डोहात मनसोक्त डुंंबण्यासाठीआतुरणारी मुले माहेरच्या माणसांना, मैत्रीणींना भेटता येईल; जुन्या आठवणींचे पदर उलगडतील म्हणून कधीच मनाने गावी पोहोचलेली सासूरवासीण गावी जायला मात्र आता चक्क मुलांसह विरोध करत आहे

पोलादपूर: बच्चेकंपनीला शाळेच्या सुट्टया पडल्या आहेत, त्यात नातेवाईकांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. त्यामुळे शहरात नोकरी व्यवसायामुळे असलेला चाकरमानी आपल्या कुटुंबासह गावीजाण्याचा बेत करत आहे. मात्र असे असले तरी आंबे, फणस, काजू, करवंदाचा आस्वाद घेण्यासाठी नदी पात्रातील डोहात मनसोक्त डुंंबण्यासाठीआतुरणारी मुले माहेरच्या माणसांना, मैत्रीणींना भेटता येईल; जुन्या आठवणींचे पदर उलगडतील म्हणून कधीच मनाने गावी पोहोचलेली सासूरवासीण गावी जायला मात्र आता चक्क मुलांसह विरोध करत आहे. गावी होणारा उष्म्याचा त्रास आणि ‘हंडाभर पाण्यासाठी का फिरवशी जगदिशा’ अशी गत गावाला येण्याने होत असल्याने आता चक्क चाकरमान्यांनी गावाकडे पाठ फिरवल्याचे विदारक सत्य वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील अन्य भागातही अशी अवस्था असली तरी या तालुक्यतील काही भागातील हे वास्तव अस्वस्थ करणारे आहे.
पिण्याच्या पाणी टंचाईचा वेढा पेण, पनवेल , कर्जत, खालापूर, महाड या तालुक्यांना पडला असून पोलादपुर
तालूक्यात पाणीटंचाई दिवसा गणिक उग्र स्वरूप धारण करत आहे. या वर्षी पोलादपूर पंचायत समितीने मंजुरीसाठी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाकडे पाठविलेल्या पाणी टंचाई निवारण कृती आराखडयात ३६ गावे ९४ वाड्यांचा समावेश केला असून आतापर्यंत ८ गावे आणि १९वाड्यांकडून मागणी अर्ज करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रातांधिकारी कार्यालयाकडून एकूण२७ गाव-वाड्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून कालवली, चांभारगणी बुद्रूक, परसूले, देवळे , मौरसडे , बोरघर महाल गुर, मोरागिरी, कोढवी या गावांसह चांभारगणी-किनेश्वरवाडी,बालमाची, आंबेमाची, कालवली-विठ्ठलवाडी कालाव ली -पवारवाडी , कालवली -भोसलेवाडी, किनेश्व र – पेठवाडी , तुटवली -गलतीची वाडी , महाल गुर- मोरेवाडी,बोरावळे -कोडबेकोंड धामणदेवी भरणेवाडी, बोरावळे -गुडेकर कोंड या पाणी टंचाईग्रस्त गाववाड्यांना पाच हजार आणि नऊ लिटर पाणी वाहून नेणार्‍या दोन टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पंचायत समितीचे पाणी पुरवठा अधिकारी अविनाश कांबळे यांनी दिली आहे.
यंदा वातावरणातील उष्म्याने कहर केला असून बळीराजा सकाळी दहाच्या आत शेतीची कामे आटोपून घरी परतत आहे. गावागावात भरदुपारी शुकशुकाट आणि सामसूम होत असल्याचे चित्र ण असून गावालगत वाहणारे ओढे वहाळ यांच्या पात्रात पाण्याचा टिपूसही दिसून येत नाही. गावोगावी नळ पाणी पुरवठा करणार्‍या योजनांच्या विहीरीतील पाण्याने तळ गाठला आहे. तर वाड्यांवर असलेल्या हातपंपांच्या तोट्यांनी मान टाकली आहे. त्यामुळे दरदिवशी पाणीटंचाईग्रस्त गाववाडयांची संख्या वाढ होत आहे .

जलाशयांची कामे हाती घेणे गरजेचे
भूगर्भातील पाण्याची पातळी मे अखेर ते जूनच्या पहिल्या सप्ताहापर्यंत अतिखोलवर जात असल्याने दरवर्षी पाण्याचे संकट उभे ठाकते, असे भूजल शास्त्रज्ञांकडून मत व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी भूगर्भात पाण्याच्या पातळी त वाढ होण्याकरिता जास्तीत जास्त पावसाचे पाणी अडवूमन ते जमिनीत मुरविले पाहिजे, लहान धरणे बांधण्यास प्राधान्य दिले पाहिजे, सिमेंट बंधारे लहान नद्यांमधील गाळ काढला पाहिजे. या दिवसांमध्ये लग्नसोहळे , धार्मीक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात त्यामुळे पाण्याचा मोठा वापर करण्यात येत असतो, अशा अतिवापरावर कडक र्निबंध आणणे आवश्यक आहे तसेच बंद पडलेल्या पाणी योजना पुनःकार्यान्वित करणे, पाझर तलाव, वनराई बंधारे, शेततळे, गावतलाव आदी जलाशयांची कामे हाती घेणे गरजेचे ठरले आहे.

 ठोस कृती कार्यक्रम घेण्याची मागणी
पावसाचे दिवस सरासरी ८४ असून डोंगरमाथ्यावरून वाहून आलेले तालुक्यातील पाच नद्यांचे पाणी सावित्री नदीत मिसळून थेट समुद्राला मिळते हे पाणी डोंगर भागावर तसेच पायर्‍यांची मजगी, समपातळी आणि ढाळीचे बांध, अनघड दगडांचे बांध, माती बांध , माती नाला बांध , वळण बंधारेही कामे करण्यात आली तर येथील मातीची पाणी मुरविण्याची क्षमता कमी असली तरी गावे पाणीदार होणार आहेत. त्यामुळे शासनाने यंत्रणांमार्फत गावोगावी पाण्याचा जागर करून प्रत्येक घटक एकवटण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबवावा अशी ग्रामीण भागातील जनतेकडून मागणी करण्यात येत आहे.