घररायगडविरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकाप मध्ये इन्कमिंग सुरूच

विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकाप मध्ये इन्कमिंग सुरूच

Subscribe

महानगरपालिका क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने लावलेल्या कर प्रणालीला खांदा कॉलनी येथून नागरिकांचा जोरदार विरोध होत आहे.

सध्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रश्न प्रलंबित आहेत. अशा प्रश्नांना घेऊन शेतकरी कामगार पक्ष जनतेसोबत आवाज उठवत आहेत. सध्या महानगरपालिका क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने लावलेल्या कर प्रणालीला खांदा कॉलनी येथून नागरिकांचा जोरदार विरोध होत आहे. यावेळी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी प्रशासनाला वेळोवेळी जाब विचारत नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या नागरिकांसाठी आणि युवकांसाठी सुरू असलेल्या कार्याबद्दल प्रभावित होऊन खांदा कॉलनी येथील श्री रोहन व्हटकर मित्र परिवार युवा कार्यकर्त्यांनी आज शेतकरी कामगार पक्षा मध्ये श्री.प्रितम म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्री.शंकरशेठ म्हात्रे, मा.उपनगराध्यक्ष श्री.गणेश पाटील , शेकाप प.म.पा.जिल्हा कार्याध्यक्ष श्री. महादेव वाघमारे, मा.नगरसेवक श्री.शिवाजी थोरवे , मा.नगरसेवक श्री.डी. पी. म्हात्रे,कामगार नेते श्री.प्रकाश म्हात्रे,शेकाप सहचिटनीस श्री.नंदकुमार भोईर, खांदा कॉलनी शेकाप अध्यक्ष श्री अनिल बंडगर, शेकाप नेते श्री.हरिश्चंद्र मढवी,युवानेते श्री. मंगेश अपराज हे उपस्थित होते.

- Advertisement -

याप्रसंगी तरुणांना मार्गदर्शन करताना श्री प्रितम म्हात्रे म्हणाले की शेतकरी कामगार पक्ष आज पर्यंत तरुणांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आला. जेणेकरून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. यापुढेही नव्याने पक्षात येणाऱ्या तरुणांसाठी पक्षाच्या मार्फत रोजगार, स्वयंरोजगार साठी योग्य ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. खांदा कॉलनी मधील प्रवेश केलेल्या तरुणांमुळे खांदा कॉलनी शेतकरी कामगार पक्षाला एक नवीन तरुणांची फळी मिळाली याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी प्रवेश करते श्री रोहन व्हटकर यांनी सांगितले की, प्रितमदादांनी आजपर्यंतचे शे.का.पक्ष आणि त्यांच्या जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था या संस्थेमार्फत जे उपक्रम राबवले त्यांचे सुरू असलेले काम पाहून आम्ही सर्व तरुणांनी एकत्रितपणे दादांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश करून पनवेलच्या विकासासाठी त्यांचे हात बळकट करण्याचे ठरवले आणि आम्ही एक मुखाने पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला. पूरग्रस्तांसाठी गेले दोन दिवस दादांच्या माध्यमातून जे मदत कार्यसुरू आहे. त्यामध्ये एक आमचा सुद्धा छोटासा वाटा म्हणून आमच्या मंडळातर्फे पाण्याचे बॉटल पूरग्रस्तांसाठी देत आहोत.

- Advertisement -

हेही वाचा – आमच्या दौऱ्याच्या माहितीमुळे मुख्यमंत्र्यांनी चिपळूण दौरा केला, नारायण राणेंचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -