घररायगडपेणमध्ये विक्रम मिनिडोअर संघटनेचा मोर्चा; नगरपालिकेला दिला इशारा

पेणमध्ये विक्रम मिनिडोअर संघटनेचा मोर्चा; नगरपालिकेला दिला इशारा

Subscribe

शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या भाजी मंडई संकुलाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील विक्रम मिनिडोअर चालक मालक आपली वाहने लावून उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र सदर जागा ही पेण नगरपालिका हडप करीत असल्याचा आरोप करीत नगरपालिकेला एक इंचही जागा देणार नाही असा इशारा सोमवारी विक्रम मिनिडोअर संघटनेच्यावतीने विष्णू पाटील यांनी प्रशासनाला दिला. नगरपालिका हद्दीतील जागेकरीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली विक्रम मिनिडोअर संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात काढण्यात आले होते.

पेण: शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या भाजी मंडई संकुलाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील विक्रम मिनिडोअर चालक मालक आपली वाहने लावून उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र सदर जागा ही पेण नगरपालिका हडप करीत असल्याचा आरोप करीत नगरपालिकेला एक इंचही जागा देणार नाही असा इशारा सोमवारी विक्रम मिनिडोअर संघटनेच्यावतीने विष्णू पाटील यांनी प्रशासनाला दिला. नगरपालिका हद्दीतील जागेकरीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली विक्रम मिनिडोअर संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात काढण्यात आले होते. यावेळी बोलताना पाटील यांनी या आंदोलनात हजारोंच्या संख्येने चालक आणि मालक यांचे कुटुंबही यावेळी उपस्थित होते, तर मोर्चात सर्व पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिवसेना तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर, शेकापचे माजी सभापती डी.बी.पाटील, मंगेश दळवी, काँग्रेस तालुकाध्यक्ष अशोक मोकल, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दयानंद भगत, नंदा म्हात्रे, माजी नगरसेवक संतोष पाटील, शोमेर पेणकर, प्रविण पाटील, समिर म्हात्रे, दिलीप पाटील, संघटनेचे अध्यक्ष देवचंद पाटील आदिंसह विक्रम मिनीडोअर चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चा करीता पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

… अन्यथा उग्र आंदोलन करणार
अंतिम भूखंड १०० यामध्ये गेली अनेक वर्षे विक्रम मिनीडोअर चालक मालक येथे उदरनिर्वाह करत असताना १९९८ साली आंदोलन करून त्यावेळचे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी सदर जागा या वाहनांसाठी देण्याचे ठरवले. मात्र पुन्हा २००८ पासून सत्ताधार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे नगरपालिका हा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र सदरची जागा ही आमची असून आमच्यावर कोणी अन्याय करत असेल तर त्याला तशाच प्रकारचे प्रतिउत्तर दिले जाईल. तेव्हा प्रशासनाने तात्काळ सहकार्य करून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा यापुढे उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा विक्रम मिनिडोअर संघटनेच्यावतीने विष्णू पाटील यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

पेण नगरपालिका हद्दीत असणार्‍या भूखंडाबाबत विक्रम मिनीडोर चालक-मालक संघटनेच्या वतीने जे निवेदन आले आहे, त्या निवेदनाची दखल घेता जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
-जीवन पाटील,
मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद
—–

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -