घररायगडओव्हरलोड वाहतूक अडवून ग्रामस्थांनी केला ‘रास्ता रोको’

ओव्हरलोड वाहतूक अडवून ग्रामस्थांनी केला ‘रास्ता रोको’

Subscribe

ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची होत असलेली दुर्दशा पाहता अशा वाहतुकीवर नियंत्रण आणावे अशी मागणी स्थानिकांची असतानाही प्रशासनाने याबाबत कोणतीच कारवाई केली नाही. अखेरीस स्थानिकांनीच गुरुवारी ओव्हरलोड वाहतुक अडवत ‘रास्ता रोको’ केला.

खोपोली: ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची होत असलेली दुर्दशा पाहता अशा वाहतुकीवर नियंत्रण आणावे अशी मागणी स्थानिकांची असतानाही प्रशासनाने याबाबत कोणतीच कारवाई केली नाही. अखेरीस स्थानिकांनीच गुरुवारी ओव्हरलोड वाहतुक अडवत ‘रास्ता रोको’ केला.
खालापुर तालुक्यामधील काही ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था दयनीय असल्याने याचा नाहक त्रास प्रवासी वर्गासह वाहन चालकांना करावा लागत आहे. तर तालुक्यातील काही रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा बनल्याने प्रवास करणे प्रवासी वर्गाला जिकरीचे बनले आहे. माणकीवली शेणगाव रस्ता हा गेल्या काही वर्षापूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत नुतनीकरण बनवत हा मार्ग सुखकर बनवला होता. मात्र याच रस्त्या लगत चार – पाच खडी मशिन असल्याने या खडी मशिनवरुन माल वाहतूक करण्यासाठी येत असलेली मोठी वाहने ही क्षमतेपेक्षा अधिक खडी घेऊन ओव्हरलोड वाहतुक करीत आहेत. त्यामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या ओव्हरलोड वाहतूक करणार्‍या वाहन चालकांना कोणाचा अंकुश आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना चाळण झालेल्या मार्गामुळे पादचारी, दुचाकी, तीनचाकी वाहतूक करणार्‍यांना हा खड्डेमय रस्ता डोकेदुखी ठरत आहे. तरी प्रशासनाने या ओव्हरलोड करणार्‍या वाहनांवर दंडात्मक करीत या खडी मशीन मालकांनाही ओव्हरलोड वाहतूकीसाठी कडक नियम लावावेत अशी मागणी नेहमीच केली जात आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने माणकीवली ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ही ओव्हरलोड वाहतूक अडवली. त्यामुळे याठिकाणची ओव्हरलोड वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

उपोषण आंदोलनाचा इशारा
माणकीवली परिसरातील खडी मशिनवरील ओव्हरलोड वाहतूक करणार्‍या वाहनांविरोधात अनेक महिन्यांपासून नाराजीचा सूर उमटत असून अशाी वाहतूक करणार्‍यां वाहनांवर प्रशासनाने कडक नियम लावावेत, अशी मागणी आम्ही अनेकदा केली, परंतु संबंधित प्रशासनाने कोणतीही ठोस पाऊले न उचलल्याने ओव्हरलोड वाहतूक अडवली आहे. पुढील काळात प्रशासनाने यावर कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन तसेच उपोषणाचाही मार्ग स्विकारु, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -