Maharashtra Assembly Election 2024
घररायगडVote Counting : रायगडकरांनो, तुमच्या मतदारसंघातील मतमोजणी या केंद्रांवर होणार, जाणून घ्या...

Vote Counting : रायगडकरांनो, तुमच्या मतदारसंघातील मतमोजणी या केंद्रांवर होणार, जाणून घ्या ती केंद्रे

Subscribe

पनवेल : विधानसभेसाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान झाले. त्यानंतर ईव्हीएम स्ट्राँगरूममध्ये नेण्यात आल्यात. उद्या शनिवारी (23 नोव्हेंबर) मतमोजणी सुरू होऊन निकाल लागण्यास सुरुवात होईल. रायगड जिल्ह्यात एकूण 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. मतमोजणीसाठी कर्मचारी, अधिकारी तसेच सुरेक्षेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त प्रत्येक मतमोजणी केंद्रावर ठेवण्यात आला आहे.

एवढे कर्मचारी सज्ज

सातही मतदारसंघात मिळून 181 मतमोजणी पर्यवेक्षक, 204 मतमोजणी सहाय्यक, 165 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, 183 इतर पथकातील अधिकारी (वर्ग-2), 986 इतर पथकातील अधिकारी (वर्ग-3), 734 चतुर्थ श्रेणी कर्मचारी असे एकूण 2 हजार 453 अधिकारी, कर्मचारी सज्ज झाले आहेत.

- Advertisement -

हे आहेत मतमोजणी केंद्र

188 – पनवेल मतदारसंघ

मतमोजणी केंद्र – कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज, ठाणा नाक्याजवळ, पनवेल
टेबल – 24
मतमोजण्यांच्या फेऱ्या – 25
कर्मचारी – 689
मतमोजणी निरीक्षक – दुनी चंद्र राणा

- Advertisement -

१८९ – कर्जत मतदारसंघ

मतमोजणी केंद्र – कर्जत प्रशासकीय भवन, पहिला मजला, कर्जत
टेबल – 14
मतमोजण्यांच्या फेऱ्या – 26
कर्मचारी – 321
मतमोजणी निरीक्षक – जगदीप धंदा

हेही वाचा…  Nana Patole : महायुतीत गडबड सुरू ते काहीही पाप करू शकतात; पटोले स्पष्टच म्हणाले…

१९० – उरण मतदारसंघ

मतमोजणी केंद्र – दि. बा. पाटील मंगल कार्यालय, जासई
टेबल – 14
मतमोजण्यांच्या फेऱ्या – 25
कर्मचारी – 284
मतमोजणी निरीक्षक – राजेश कुमार आयव्ही

१९१ – पेण मतदारसंघ

मतमोजणी केंद्र – के.ई.एस.लिटील एंजल स्कूल, पेण
टेबल – 14
मतमोजण्यांच्या फेऱ्या – 27
कर्मचारी – 291
मतमोजणी निरीक्षक – संतोष कुमार राय

१९२ – अलिबाग मतदारसंघ

मतमोजणी केंद्र – जिल्हा क्रीडा संकुल नेहुली-खंडाळे
टेबल – 14
मतमोजण्यांच्या फेऱ्या – 27
कर्मचारी – 349
मतमोजणी निरीक्षक – रुही खान

१९३ – श्रीवर्धन मतदारसंघ

मतमोजणी केंद्र – उपविभागीय अधिकारी कार्यालय, पहिला मजला, श्रीवर्धन
टेबल – 14
मतमोजण्यांच्या फेऱ्या – 25
कर्मचारी – 220
मतमोजणी निरीक्षक – सतीश कुमार एस.

१९४ – महाड-पोलादपूर मतदारसंघ

मतमोजणी केंद्र – डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड
टेबल – 14
मतमोजण्यांच्या फेऱ्या – 28
कर्मचारी – 292
मतमोजणी निरीक्षक – आदित्य कुमार प्रजापती

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -