घररायगडमहाड तालुक्यातील जलस्रोत आटले; टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागली

महाड तालुक्यातील जलस्रोत आटले; टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागली

Subscribe

महाड तालुक्यात गेली काही दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. ज्या ठिकाणी बोअरवेल, विहिरी आहेत त्यांची पाण्याची पातळी देखील झपाट्याने घटली आहे. यामुळे तालुक्यातील टंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. सध्या जवळपास ८८ वाड्या आणि ७ गावांमधून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. शासनाने पावसाळ्यापूर्वी राबवलेल्या जलजीवन सारख्या योजना सपशेल फेल गेल्याचे चित्र दिसू लागले आहे. पाणी टंचाई मुळे शहरातील चाकरमनी गावाकडे येण्यास उत्सुक नसल्याने अनेक गावात शुकशुकाट देखील आहे.

निलेश पवार: महाड
तालुक्यात गेली काही दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. ज्या ठिकाणी बोअरवेल, विहिरी आहेत त्यांची पाण्याची पातळी देखील झपाट्याने घटली आहे. यामुळे तालुक्यातील टंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. सध्या जवळपास ८८ वाड्या आणि ७ गावांमधून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. शासनाने पावसाळ्यापूर्वी राबवलेल्या जलजीवन सारख्या योजना सपशेल फेल गेल्याचे चित्र दिसू लागले आहे. पाणी टंचाई मुळे शहरातील चाकरमनी गावाकडे येण्यास उत्सुक नसल्याने अनेक गावात शुकशुकाट देखील आहे.
मोठ्या प्रमाणात पाऊस आणि पूरपरिस्थिती पावसाळ्यात निर्माण होत असतानाही अनेक गावांना उन्हाळ्यात पाणी पाणी करावे लागत आहे. तालुक्यात गतवर्षीही समाधानकारक पाऊस झाला असला तरीही सातत्याने पाणी टंचाई जाणवत आहे.
महाड तालुक्यात १८५ नळपाणी पुरवठा योजना आहेत. परंतु पाण्याचे स्त्रोत संपल्याने या पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. नद्या नाले आटल्याने गुरांना लागणा-या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. दुर्गम भागात पाण्याचे अन्य स्त्रोत उपलब्ध नसल्याने सद्यस्थितीत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यावर्षी जलजीवन योजना राबवल्या जात आहेत मात्र या योजना राबवताना देखील ठेकेदार आपला स्वार्थ साधत असल्याने ग्रामीण भागात या योजना फेल ठरत आहेत.
तालुक्यात पिंपळकोंड, सोपे / गोवेले, शेवते, भोगाव, आढी, वीर या सात गावांमधून तर निगडे गावाच्या खोतवाडी, मोरेवाडी, उतेकरवाडी, फणसेवाडी, जगतापवाडी, कदमवाडी, नातोंडी मारुती वाडी, बौद्धवाडी, सोनारवाडी, बुरुडवाडी, मोहल्ला, रेवतळे, रेवतळे फौजदार कोंड, चोचिंदे गौळवाडी, कुंभार्डे धनगरवाडी, फौजी अंबावडे जंगमधार, करंजाडी म्हस्केकोंड, ताम्हाणे धनगरवाडी, कावळे धनगरवाडी, तळीये मधली वाडी, बौधवाडी, चर्मकार वाडी, कुंभेनळी, खालची वाडी, आदिवासी वाडी, पांगारी धार, वाकी बुद्रुक बौद्धवाडी, गावठाण, नारायणवाडी, धनगरवाडी, शेवते आंब्याचा मळा, रोहिदास वाडी नानेमाची, पेढामकरवाडी, भोगाव आदिवासी वाडी, सुखदरे कोंड, देऊळ कोंड, बौद्धवाडी आडी, आडी बौद्धवाडी, दत्तवाडी, दाभोळ दाभोळ खलाटवाडी, पुनाडे गाव, कुंभे शिवथर, सुनेभाऊ, चेराववाडी, रावतळी मानेचाधार, सुतारआळी, बौद्धवाडी, मावळती कोंड, झटाम मोहल्ला, मधली वाडी, उगवती वाडी, मधली वाडी, इसाने मोहल्ला, मोहोत वडघर भिवघर आदिवासी वाडी, दहिवड आदिवासी वाडी, जिते तेरडेवाडी, मोहोत कातिवडे, बोरगाव, वीर भवानीनगर, मोहल्ला, खडकवाडी, टेंबे आदिवासी वाडी, दत्तवाडी, गणेशवाडी, घोलेवाडी, ताम्हाने बौद्धवाडी, दळवीवाडी, बद्रिकेवाडी, दाभेकर वाडी, मोहितेवाडी, धुमाळवाडी, जोगळेवाडी, पवारवाडी, खामकर कोंड, दासगाव भोईवाडी, आदिवासी वाडी, जाधव वाडी, गणेश नगर, बौद्धवाडी, चर्मकार वाडी, पाटील आळी, न्हावी कोंड, पेटकर आळी, नगरभवन, वाळसुरे दत्तवाडी, याचबरोबर पिंपळकोंड, पाचाड गाव व वाड्या, पुनाडे, सापे, साकडी, नेराव, या वाड्यांना देखील टंचाईची झळ पोहचत आहे. या ठिकाणी टँकर पाणीपुरवठा हाच आधार उरला आहे. पाण्याचा टँकर हा दररोज जात नसल्याने पाणी पुरवून वापरावे लागत असते.

एप्रिलमध्येच तालुक्यात पाणीटंचाई
पाणी योजना राबवताना योग्य नियोजन केले जात नसल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सन २०१९ मध्ये टंचाई आराखड्यात ५४ गावे व १८४ वाड्यांचा समावेश होता. गेल्या वर्षी १२ गावे, ८२ वाड्यांना ९टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. यावर्षी ८८ वाड्या आणि ७ गावांमधून टंचाई जाणवू लागली आहे. यावर्षी वाढलेल्या तापमानामुळे नद्या, नाले, विहिरी, विंधन विहीरी हे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत एप्रिलमध्येच आटल्याने तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

- Advertisement -

पाण्याअभावी चाकरमान्यांचा परतीचा प्रवास
उन्हाळ्याच्या सु्ट्टीचे दिवस असल्याने अनेक गावांमध्ये मुंबई, सुरत, पुण्याकडील चाकरमानी राहण्यासाठी येत असतात. मात्र वाढते तापमान आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे गावाकडे येण्यास चाकरमानी उत्सुक नाहीत. केवळ लग्नसराई असल्याने एखाद्या लग्न सोहळ्यास भेट देवून चाकरमानी पुन्हा परतीच्या प्रवास धरत आहेत. पाणीटंचाईमुळे गुराढोरांना दूरवर डबक्यात साठलेले पाणी पाजण्यासाठी न्यावे लागते. तर महिलावर्गही कपडे धुण्यासाठी अशाच नदीत साठलेल्या पाण्याचा वापर करत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. दुर्गम भागात असलेल्या आदिवासी व धनगरवाड्यांना या टंचाईचा मोठा फटका जाणवत आहे. कावळे धनगरवाडी, गोंडाऴे आदिवासीवाडी, आढी गौळवाडी, पारवाडीच्या आदिवासीवाड्या, वीर खरबकोंड अशा वाड्यांत ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -