घररायगडनेरळमध्ये जनरेटरद्वारे पाणी पुरवठा; बिल थकल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत

नेरळमध्ये जनरेटरद्वारे पाणी पुरवठा; बिल थकल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत

Subscribe

जिल्ह्यातील आर्थिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून मोठी असलेली नेरळ ग्रामपंचायत आता आर्थिक कोंडीत सापडलेल्या अवस्थेत आहे. नुकतेच ग्रामपंचायतीकडे निधी नसल्याने ती नेरळ विकास प्राधिकरणाच्या भरवश्यावर असल्याची लेखी माहिती ग्रामविकास अधिकारी यांनी दिली होती. तर आता ग्रामपंचायतीने पाणी योजनेचे बिल थकीत ठेवल्याने महावितरणने कारवाई केली आहे. पाणी योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने नेरळ ग्रामपंचायत आता डिझेल भरोशावर असल्याचे चित्र आहे.

कर्जत:  जिल्ह्यातील आर्थिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून मोठी असलेली नेरळ ग्रामपंचायत आता आर्थिक कोंडीत सापडलेल्या अवस्थेत आहे. नुकतेच ग्रामपंचायतीकडे निधी नसल्याने ती नेरळ विकास प्राधिकरणाच्या भरवश्यावर असल्याची लेखी माहिती ग्रामविकास अधिकारी यांनी दिली होती. तर आता ग्रामपंचायतीने पाणी योजनेचे बिल थकीत ठेवल्याने महावितरणने कारवाई केली आहे. पाणी योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने नेरळ ग्रामपंचायत आता डिझेल भरोशावर असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात एकूण ८०९ ग्रामपंचायती असून त्यामध्ये १८०० च्यावर महसुली गावाचा समावेश आहे. तर त्यापैकी लोकसंख्या आणि आर्थिक दृष्ठ्या सक्षम म्हणून नेरळ ग्रामपंचायतीचा पहिला नंबर लागतो. जिल्ह्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळ ग्रामपंचायतीचा लौकिक आहे. मात्र या लौकिकासोबत कायम काहीतरी कारणाने नेरळ ग्रामपंचायत चर्चेत देखील असते. कधी अधिकचे कामगार, कधी कामगारांना पगारच नसल्याने आंदोलन अशा गोष्टींमुळे ग्रामपंचायत कायम चर्चेत असते.
दरम्यान ग्रामपंचायत नेरळची आर्थिक स्थिती खालावली असल्याचे खुद्द ग्रामविकास अधिकारी यांनी लेखी माहितीत सांगितले होते. त्यामुळे नेरळचा विकास आता नेरळ विकास संकुल प्राधिकरण यांच्या भरवशावर आहे. त्यामुळे लवकरात लवकर विद्युत देयक अदा न केल्यास नेरळ शहरात पाणीबाणी उद्भवण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायत काय पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वीज बिलाची रक्कम थकीत
नेरळ या मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत असलेल्या ग्रामपंचायतमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने १९९८ मध्ये राबवलेली नळपाणी योजना म्हणजे उल्हास नदीवरून पाणी उचलून नेरळ गावात आणण्यात येते.बोर्ले येथे असलेल्या उद्धभव केंद्रातून पाणी उचलण्यासाठी वीज वापरली जाते आणि त्या वीज वापराचे देयक काही महिने थकीत आहे. महावितरणकडून सध्या थकीत विद्युत बिलावर वसुलीची मोहीम सुरू आहे. परिणामी वीज बिलाची थकीत रक्कम वसूल करण्याचा दबाव महावितरण कार्यालयावर आहे.

- Advertisement -

आता डिझेलचा भार ग्रामपंचायतीवर
वेळेत देयक जमा न केल्यामुळे महावितरणने पाणी योजनेचा विद्युत पुरवठा गेल्या शुक्रवारी दुपारी खंडित केला आहे. तर नेरळमध्ये पाणीबाणी उद्भवू नये म्हणून ग्रामपंचायतने आता जनरेटरचा आधार घेतला आहे. मात्र यामुळे दिवसाकाठी ७० ते ८० हजारांच्या डिझेलचा भार ग्रामपंचायतीवर पडत आहे. तसेच जनरेटर सुस्थितीत नसल्याने शनिवारी शहरामध्ये पाण्यासाठी बोंबाबोंब झाली होती. मात्र तत्काळ जनरेटरचे काम मार्गी लावण्यात आले. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत झाला.

नेरळ ग्रामपंचायतीवर पाणी योजनेचे मोठे बिल शिल्लक होते. आमच्या काळात आम्ही ते कमी करत आणले आहे. मात्र तरीही दर महिन्याला त्यात ८ लाखांची भर पडत असते. तसेच व्याज देखील वाढत असते. आता साधारण २७ ते २८ लाखांच्या आसपास देयक शिल्लक असेल. तसेच महावितरणच्या अधिकार्‍यांशी बोलून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
– उषा पारधी,
सरपंच, नेरळ ग्रामपंचायत

- Advertisement -

नेरळ पाणी योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केल्याचे समजले. महावितरणच्या अधिकार्‍यांशी बोलणे सुरू आहे. बिलाची काही रक्कम अदा करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून जनरेटरवर पाणी पुरवठा केला जात आहे
– गणेश गायकर,
ग्रामविकास अधिकारी, नेरळ ग्रामपंचायत
==================

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -