घररायगडसुरळीत वीज पुरवठ्यासाठी तारेवरची कसरत

सुरळीत वीज पुरवठ्यासाठी तारेवरची कसरत

Subscribe

महावितरणाचे डीबी देखील कित्येक तास पाण्याखाली गेले होते.

आठवडाभरापासून कोपलेल्या वरुणराजाने महावितरणला देखील हिसका दाखविला आहे. ठिकठिकाणचा खंडित वीज पुरवठा सुरळीत करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली आहे. तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला. बुधवारी रात्री कमी वेळात पडलेल्या प्रचंड पावसाचा अंदाज अनेकांना आला नव्हता. त्यामध्ये महावितरण देखील होते. शहर परिसरातील अनेक भाग पाण्याखाली होते. महावितरणाचे डीबी (डिस्ट्रिब्यूशन बोर्ड) देखील कित्येक तास पाण्याखाली गेले होते. औद्योगिक पट्टा असल्याने वीज पुरवठा सुरळीत ठेवणे आवश्यक असल्याने महावितरणची धावपळ झाली होती. त्यातच अपुरी कर्मचारी संख्या, अप्रशिक्षित कर्मचारी, साधनसामग्रीची कमतरता यामुळे कामाचा अतिरिक्त भार वाढला होता.

येथील महावितरण कार्यालय आणि वावोशी या दोन्ही विभागात औद्योगिक पट्टा आणि घरगुती वापर ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कार्यालयांतर्गत ९ ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास २५ गावे आहेत, तर ५ हजार ७०० घरगुती ग्राहक संख्या आहे. औद्योगिक भागामुळे १० फिडर कार्यालयांतर्गत येतात. खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी उप मुख्य कार्यकारी अभियंता व्ही. व्ही. गायकवाड आणि विभागाचे अभियंता सचिन धनुधर्मी यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने बुधवारी दिवसभर मेहनत घेतल्याने वीज पुरवठा हळूहळू पूर्वपदावर आला.

- Advertisement -

चार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांमध्ये एक महिला कर्मचारीचाही समावेश आहे. चार वर्षांपूर्वी खालापूर महावितरण कार्यालयात कर्मचारी संख्या ११ च्या घरात होती. त्यानंतर कर्मचारी निवृत्तीनंतर नवीन कर्मचारी नेमणूक न झाल्याने सध्या ४ कर्मचारी आणि ६ कंत्राटी कामगार २५ गावांचा डोलारा सांभाळत आहेत.


हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -