घरश्रावण स्पेशलविविध राज्यात अशी साजरी होते 'नागपंचमी'

विविध राज्यात अशी साजरी होते ‘नागपंचमी’

Subscribe

यावर्षी २१ जुलैपासून श्रावण महिन्यास सुरूवात होत आहे. श्रावण महिना म्हणजे सणवारांची लयलूट. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणामागे एक कथा आहे. या महिन्यातील पहिला सण आहे तो म्हणजे ‘नागपंचमी’. वेदकाळापासून या दिवशी नागांची पूजा करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला जातो. शिव मंदिराबरोबरच घरोघरी नागाची पूजा केली जाते. त्याला दुधाचा नैवेद्य अर्पण केला जातो. काही ठिकाणी गव्हाची खीर देखील बनवली जाते.

काय आहे नागपंचमीची कथा?

नागपंचमीशी संबंधित अनेक कथा आहेत. यात सत्येश्वरी देवीची कथा आहे. सत्येश्वरीला एक भाऊ होता. सत्येश्वर असे त्याचे नाव होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वरचा अकस्मित मृत्यू झाला. भावाच्या विरहामुळे सत्येश्वरी दु:खी होती. तिने अन्नत्याग केला होता. त्याचवेळी तिला सत्येश्वर नागरुपात दिसला. त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला. सत्येश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे मी रक्षण करेल, असे नागदेवतेने वचन दिले. त्यानंतरच नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या.

- Advertisement -

देशात विविध पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते

गुजरातमधील कच्छ येथे भुजिया गडावरील भुजंग नाग मंदिरात रंगीबेरंगी रोषणाई करत नागपंचमी साजरी केली जाते.

- Advertisement -

उत्तर प्रदेश-विविध राज्यात नागपंचमी साजरी करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये नागपंचमीच्या दिवशी कुस्त्यांचे आयोजन केले जाते. त्यासाठी आखाडा सजवला जातो. विशेष म्हणजे येथील नरसिंहगड आखाड्यात नागाच्या प्रतिकृतीला दूग्धस्नान केले जाते. नागाच्या विहीरींची आणि महादेवाची करूणा केली जाते.

तर प्रयागराज येथेही नाग वसुकी मंदिरात नागपूजा केली जाते.

उत्तराखंडमध्ये हरिद्वार येथे मानसा देवी मंदिरात धूमधडाक्यात नागपूजा केली जाते.

बंगळुरू येथे रामोल्ही गावात जगातील सर्वात उंच नागाची मूर्ती आहे. १६ फुट उंच आणि ६ टन वजन असलेल्या या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी नागपंचमीला मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात.

कर्नाटकातही नागपंचमी उत्साहात साजरी केली जाते.

मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे महाकालेश्वर मंदिर वर्षातून एकदा फक्त नागपंचमीच्या दिवशी २४ तास भक्तांसाठी खुले केले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -