घरक्रीडारहमत शाहचे विक्रमी शतक

रहमत शाहचे विक्रमी शतक

Subscribe

बांगलादेशविरुद्ध अफगाणिस्तानची दमदार सुरुवात

रहमत शाहने झळकावलेल्या अप्रतिम शतकामुळे बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याची अफगाणिस्तानने दमदार सुरुवात केली. या सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर अफगाणिस्तानची ९६ षटकांनंतर ५ बाद २७१ अशी धावसंख्या होती. रहमतने पहिल्या डावात १८७ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०२ धावांची खेळी केली. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये शतक लगावणारा रहमत हा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या कसोटीत रहमतने ९८ धावांची खेळी केली होती.

बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात अफगाणिस्तानचा नवा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशचा डावखुरा फिरकीपटू तैजुल इस्लामने अफगाणिस्तानचे सलामीवीर इहसानुल्लाह (९) आणि इब्राहिम झादरान (२१) यांना माघारी पाठवले. हशमतुल्लाह शाहिदीला १४ धावांवर मोहमदुल्लाहने बाद केले. त्यामुळे अफगाणिस्तानची ३ बाद ७७ अशी अवस्था होती. मात्र, यानंतर रहमत शाह आणि माजी कर्णधार असगर अफगाण यांनी त्यांचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. रहमतने ८५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने पुढेही चांगली फलंदाजी सुरू ठेवत १८६ चेंडूत आपले कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक पूर्ण केले. परंतु, यानंतर तो फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याला १०२ धावांवर नईम हसनने सौम्या सरकारकरवी झेलबाद केले. नईमनेच मोहम्मद नबीला खातेही उघडू दिले नाही. यानंतर अफगाण (नाबाद ८८) आणि अफसर झझाई (नाबाद ३५)यांनी संयमाने फलंदाजी करत ७४ धावांची अभेद्य भागी केली.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक –
अफगाणिस्तान : पहिला डाव – ९६ षटकांत ५ बाद २७१ (रहमत शाह १०२, असगर अफगाण नाबाद ८८,अफसर झझाई नाबाद ३५; नईम हसन २/४३, तैजुल इस्लाम २/७३) वि. बांगलादेश.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -