मोहालीतील सामन्याची उत्सुकता

भारत वि.आफ्रिका दुसरा टी-20 सामना

भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात होणार पहिला टी-20 सामना जोरदार पावसामुळे रद्द करण्यात आला. धर्मशाला येथे दुपारी चार वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू झाला. अखेर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारताचा दुसरा सामना मोहाली येथे होणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट नसल्याचे म्हटले जात आहे. मोहालीमध्ये सध्याच्या घडीला 28 ते 31 डिग्री एवढे तापमान आहे. त्यामुळे मोहालीमध्ये पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्यानेही सांगितले आहे.

तीन टी-20 सामन्यांची ही मालिका होणार आहे.त्यामुळे आजचा सामना जिंकण्याचे मोठे आव्हान दोन्ही संघांसमोर असणार आहे. हे दोन्ही सामने जिंकल्यास भारताला मालिका जिंकता येईल, पण एक जरी सामना भारताने गमावला तर त्यांना मालिका जिंकता येणार नाही. गेल्या दौर्‍यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ट्वेन्टी-20 मालिका जिंकली होती. त्यामुळे ही मालिका जिंकण्यासाठी भारतावर जास्त दडपण असणार आहे.

दुसर्‍या सामन्यामध्ये पावसाची शक्यता फक्त 5 ते 10 टक्के वर्तवण्यात आली आहे. सामना सुरु झाल्यावर अर्ध्या तासामध्ये पावसाचे आगमन होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण हा पाऊस जोरदार नसेल, त्याचबरोबर जास्त वेळ पावसामुळे वाया जाणार नाही, असे म्हटले जात आहे.

भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर आणि नवदीन सैनी.

दक्षिण आफ्रिकेचा संघ –

क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, तेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी आणि जॅन जान स्मट्स.