Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021: आयपीएल लाईव्ह प्रक्षेपण टीममधील १४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

IPL 2021: आयपीएल लाईव्ह प्रक्षेपण टीममधील १४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

आयपीएलच्या अडचीत वाढ

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रिमियर लिग (आयपीएल) २०२१ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आगामी ४ दिवसानी आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळला जाणार आहे. परंतु आयपीएलच्या हंगामात कोरोनाने शिरकाव केल्याने बायो बबलमधील १४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आयपीएलच्या खेळावर कोरोनाचे सावट आले आहे. हे १४ सदस्य लाईव्ह प्रक्षेपणाच्या तांत्रिक टिममधील असल्यामुळे आयपीएल व्यवस्थापनाच्या चिंता वाढली आहे. येत्या ९ एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्जमध्ये पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. परंतु आता बीसीसीआय आणि आयपीएल व्यवस्थापन कमिटीची चिंता वाढली असल्याचे दिसते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या १४ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना चाचणी केली असता चाचणी अहवास सकारात्मक आला आहे. यामध्ये कॅमेरामॅन,निर्माता,दिग्दर्शक,लाईव्ह स्लोमोशन आणि ग्राफिक्स एडीटर आणि व्हिडिओ एडीटरचा समावेश आहे.

- Advertisement -

१४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे स्टार ग्रुपची चिंता वाढली आहे. कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास स्टारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व सदस्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा खेळाडू देवदत्त पलिक्कडला कोरोनाची लागण झाली होती तर दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अक्शर पटेलला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली होती. या दोघांनाही क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल २०२१ ही ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -