घरक्रीडाबापरे! १६ वर्षांचा मुलगा Video Game खेळून झाला कोट्यधीश

बापरे! १६ वर्षांचा मुलगा Video Game खेळून झाला कोट्यधीश

Subscribe

16 year old boy gets rich by playing video gameमुलांना Video Game विकत घेऊन देण्यासाठी पालक नेहमीच नकार देतात. व्हीडिओ गेम म्हणजे नुसता टाईमपास. व्हीडियो गेममुळे कोणताच फायदा होत नाही, केवळ वेळ फूकट जातो, अशी सर्वांची समज आहे. अनेकजण तर व्हीडिओ गेम केवळ मनोरंजनासाठी खेळतात. मात्र, एखादा व्हीडिओ गेम खेळून कोट्यधीश झाल्याच्या बातमीने तुम्हाला धक्का बसेल. एका १६ वर्षाचा मुलाने व्हीडिओ गेम खेळून ५ कोटी रुपये कमावले आहेत. व्हीडिओ गेमच्या वर्ल्ड कपमध्ये भाग घेऊन वर्ल्ड कप जिंकत हा मुलगा कोट्यधीश झाला.

सर्व खेळांचे वर्ल्ड कप असतात तसेच व्हीडिओ गेम्सचा देखील वर्ल्ड कप आहे. या वर्ल्ड कपला फोर्टनाइट वर्ल्ड कप असे म्हटले जाते. गेमींग जगतातील सर्वात मोठी आणि सर्वात महागडी स्पर्धा असल्याचे बोलले जाते. हा वर्ल्ड कप जिंकून अनेक मुलांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत. अशाच पद्धतीने सनबरी सर्रे येथे राहणाऱ्या १६ वर्षीय बेंजी फिश याने गेमींग स्पर्धेतील वर्ल्ड कप जींकत कोट्यधीश झाला आहे. बेंजी फिश फोर्टनाइट गेम खेळण्यात मास्टर्स आहेत. बेंजी फिश हा इन्स्टाग्राम-ट्विटरवर खूप लोकप्रिय आहे. बेंजीचे इन्स्टाग्रामवर २ कोटी ३ लाख रुपये तर ट्विटरवर १ कोटी ३ लाख फॉलोअर्स आहेत. १२ तास ट्रेनिंग करतो.

- Advertisement -

बेंजीने आपल्या १५ व्या वाढदिवशी गेमिंग कारकीर्दीची सुरूवात केली आणि फोर्टनाइट वर्ल्ड कपमध्ये पात्र झाल्यानंतर ७५ हजार युरो म्हणजेच ७३ लाख रुपये जिंकले. जवळपास एका वर्षात, बेंजीने ५ लाख युरो म्हणजेच ४.९ कोटी रुपये जिंकले आहेत. १६ वर्षीय बेंजी फोर्टनाइट वर्ल्ड कपमध्ये बेंजी फिशी प्लेयर नावाने खेळ खेळतो. बेंजी म्हणतो की, सुरुवातीला वर्ल्डकपमध्ये काय होते हेही त्यांना माहित नव्हते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -