दिवंगत शेन वार्नच्या ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ला २९ वर्ष पूर्ण

ऑस्ट्रेलियाचा दिवंगत क्रिकेटपटू शेन वॉर्न याच्या 'बॉल ऑफ द सेंच्युरी' या चमत्कारी चेंडू आज २९ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच दिवशी म्हणजे ४ जून १९९३ रोजी एका कसोटी सामन्यादरम्यान उत्कृष्ट चेंडू फेकला होता. हा चेंडू पाहून फलंदाजही चकरावला होता.

ऑस्ट्रेलियाचा दिवंगत क्रिकेटपटू शेन वॉर्न याच्या ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ या चमत्कारी चेंडू आज २९ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच दिवशी म्हणजे ४ जून १९९३ रोजी एका कसोटी सामन्यादरम्यान उत्कृष्ट चेंडू फेकला होता. हा चेंडू पाहून फलंदाजही चकरावला होता. विशेष म्हणजे त्यावेळी शेन वॉर्नने टाकलेल्या या चेडूंची आजही संपूर्ण क्रिकेट विश्वात आणि क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा रंगते.

ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्न याने ४ जून १९९३ रोजी अॅशेस मालिकेतील एका कसोटी सामन्यात उत्कृष्ट चेंडू टाकला होता. त्यावेळी त्याचा हा चेंडू पाहून फलंदाजासह उपस्थित सर्वच खेळाडू चक्रावले. शिवाय हा सामना पाहणारेही आश्चर्यचकित झाले होते. दरम्यान, वॉर्नने टाकलेला हा चेंडू ९० डिग्रीच्या एंगलने स्विंग झाला होता. त्यामुळे या चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ असे नाव देण्यात आले.

सर्व क्रिकेटप्रेमी उत्सूक

शेन वॉर्नने टाकलेला हा चेंडू क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला टाकता आलेला नाही. त्यामुळे त्याच्या नावावर विशेष विक्रमाचीही नोंद आहे. या एका चेंडूनंतर शेन वॉर्न ज्या संघाविरोधात गोलंदाजीसाठी यायचा त्यावेळी त्याचा तो चेंडू पाहण्यासाठी सर्व क्रिकेटप्रेमी उत्सूक असायचे. शिवाय फलंदाजांमध्ये एक वेगळी भीतीही निर्माण झालेली असायची. त्यामुळे अनेक फलंदाज त्याच्यासमोर खेळण्यासाठी टाळाटाळ करायचे.

हेही वाचा – ‘शेन वॉनला खूप मिस करतोय…’, शतकी खेळीनंतर जोस बटलर भावूक

वयाच्या ५२ व्या वर्षी निधन

दरम्यान, शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. शेन वॉर्न थायलंडमध्ये असताना त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या मृत्यूची बातमी समोर येताच सर्व क्रिकेट विश्वाला धक्का बसला. मात्र, शेन वॉर्नचे निधन झाले असले तरी, त्याच्या गोलंदाजीची आणि विशेष करून या ९० डिग्री टर्न झालेल्या चेंडूंची आठवण काढतात.

हेही वाचा – इंग्लंड कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी जो रुट शेन वॉर्नच्या मागे होता; इंग्लंडचे माजी गोलंदाज डॅरेन गॉफ यांचा खुलासा

१४५ कसोटी आणि १९४ वनडे

शेन वॉर्नने १४५ कसोटी आणि १९४ वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. वॉर्नने १४५ कसोटी सामन्यांमध्ये ७०८ विकेट्स घेतल्या होत्या. ३७ वेळा ५ विकेट्स तर १० वेळा १० विकेट्स घेतल्या होत्या. एका कसोटी सामन्यात १२८ धावा देत १२ विकेट्स त्याने घेतल्या होत्या. तसेच १९४ वनडे सामन्यात त्याने २९३ फलंदाजांना बाद केले होते. वॉर्नची एकदिवसीय क्रिकेटमधील ३३ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट्स ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती.


हेही वाचा – लॉर्ड्स मैदावरवर १७ विकेट्स; भारताच्या ‘या’ माजी खेळाडूचा इंग्लंडच्या संघावर निशाणा