घरक्रीडानिवड समितीची चांदी !

निवड समितीची चांदी !

Subscribe

बीसीसीआयकडून प्रत्येक सदस्याला २० लाखांचा बोनस

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारताने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा आणि पहिल्यांदा एकदिवसीय द्विदेशीय मालिका जिंकण्याचा विक्रम केला. भारताने या दोन्ही मालिका २-१ अशा जिंकल्या. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सिनियर पुरुष संघाच्या निवड समिती सदस्यांना (एम.एस.के प्रसाद, सरनदीप सिंग, जतीन परांजपे, गगन खोडा, देवांग गांधी) प्रत्येकी २० लाखांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी बीसीसीआयने खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफलाही बोनस दिला होता.
निवड समितीची स्तुती करताना बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय म्हणाले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात जी कामगिरी केली त्यामुळे आम्ही खूप खूश आहोत. आम्ही याआधीच खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफला बोनस देण्याची घोषणा केली होती आणि आता आम्ही निवड समितीच्या प्रत्येक सदस्याला २० लाखांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. निवड समितीच्या पाच सदस्यांनी मिळून खूप चांगला संघ निवडला. या संघात खूप समतोल होता. याचा फायदा संघ व्यवस्थापनाला झाला. निवड समितीने निवडलेल्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियासारख्या आव्हानात्मक संघासमोर अप्रतिम खेळ केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -