घरक्रीडाIND vs AUS ‘A’ : सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी २० विकेट्स

IND vs AUS ‘A’ : सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी २० विकेट्स

Subscribe

भारताला पहिल्या डावात ८६ धावांची आघाडी मिळाली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील दुसऱ्या सराव सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली. तीन दिवसीय या ‘डे-नाईट’ सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी चमक दाखवली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव १९४ धावांत आटोपला. याचे उत्तर देताना ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा डाव १०८ धावांत संपुष्टात आल्याने भारताला पहिल्या डावात ८६ धावांची आघाडी मिळाली. भारताच्या गोलंदाजांनी या डावात उत्कृष्ट कामगिरी केली. मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांनी ३-३ विकेट घेतल्या. या दोघांना जसप्रीत बुमराहने २ विकेट घेत उत्तम साथ दिली.

त्याआधी या सामन्यात भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मयांक अगरवाल (२) लवकर बाद झाल्यावर पृथ्वी शॉ (४०) आणि शुभमन गिल (४३) यांनी भारताला सावरले. परंतु, यानंतर भारताने ५१ धावांतच ८ विकेट गमावल्या. जसप्रीत बुमराहने मात्र अप्रतिम फलंदाजी करत ५७ चेंडूत नाबाद ५५ धावांची खेळी केल्याने भारताने पहिल्या डावात १९४ धावांची मजल मारली. बुमराहचे हे प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक ठरले. बुमराहने मोहम्मद सिराजच्या (२२) साथीने ७१ धावांची भागीदारी रचली.

- Advertisement -

याचे उत्तर देताना ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. सलामीवीर जो बर्न्सला बुमराहने खातेही न उघडता बाद केले. यानंतर मार्कस हॅरिस (२६), निक मॅडीन्सन (१९) आणि कर्णधार कॅरी (३२) यांनी काही काळ चांगली फलंदाजी केली. मात्र, त्यांना इतरांची साथ न लाभल्याने ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा डाव १०८ धावांतच आटोपला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -