घरक्रीडाIPL 2021 Schedule: आयपीएलचा यंदाचा हंगाम ९ एप्रिलपासून होणार सुरु

IPL 2021 Schedule: आयपीएलचा यंदाचा हंगाम ९ एप्रिलपासून होणार सुरु

Subscribe

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ३० मे २०२१ रोजी अंतिम सामना रंगणार

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने रविवारी विवो इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे वेळापत्रक आज जाहीर केले आहे. ९ एप्रिलपासून पहिल्या सामन्याला चेन्नईतून सुरुवात होणार आहे. गतविजेच्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरमध्ये पहिला सामना रंगणार आहे. देशातील वाढता कोरोना प्रार्दुभाव लक्षात घेता बीबीसीआयने आयपीएल २०२१ साठी सहा स्टेडिअम्सची निवड केली आहे. यामध्ये जगातील सर्वात मोठ्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअम्सपासून ते मुंबईतील वानखेडे स्टेडिअम्सचा समावेश आहे. मुंबई, अहमदाबादबरोबर बंगळुरु, चेन्नई, दिल्ली कोलकत्त्यातही आयपीएलचे सामने रंगणार आहे. २०२१ मध्ये ११ डबल हेडर मॅच होणार आहेत म्हणजे एकाच दिवशी दोन सामने रंगणार आहेत. हे सामने दुपारचे सामने साडे तीन वाजता सुरू होतील. तर संध्याकाळचे सामने साडे सात वाजता सुरू होतील.

- Advertisement -

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ३० मे २०२१ प्ले-ऑफ आणि अंतिम सामना खेळवला जाणार आहे. २५ मे, २६ मे आणि २८ मे रोजी प्ले-ऑफचे सामने होतील. मात्र देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना स्टेडियमवर प्रवेश नसणार आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय नंतर घेण्यात येईल, असं वृत्त समोर येत आहे. यंदाच्या आयपीएल २०२१ मध्ये आठ संघ असणार असून प्रत्येक संघ चार स्टेडियमवर सामने खेळेल. चेन्नई, मुंबई, कोलकत्ता आणि बंगळुरुमध्ये प्रत्येकी १० सामने रंगणार आहेत. तर दिल्ली आणि अहमदाबादमध्ये ८ सामने होणार आहे. लीगच्या टप्प्यात सर्व संघ ६ पैकी ४ ठिकाणी खेळतील. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर सामने खेळायला मिळणार नाहीत.


हेही वाचा- IPL 2021 : यंदा आयपीएल स्पर्धा भारतात? ‘या’ तारखेला सुरुवात होण्याची शक्यता

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -