Homeक्रीडाT-20 World Cup 2024 : भारतीय संघात 'या' पाच खेळाडूंची नावं निश्चित?

T-20 World Cup 2024 : भारतीय संघात ‘या’ पाच खेळाडूंची नावं निश्चित?

Subscribe

एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर टीम इंडियाचे संपूर्ण लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर आहे. 2024 मध्ये होणारा हा विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे.

Team India: भारतीय क्रिकेट संघ सध्या टी-20 विश्वचषक 2024 च्या तयारीत व्यस्त आहे. एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर टीम इंडियाचे संपूर्ण लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर आहे. 2024 मध्ये होणारा हा विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या निवडकर्त्यांना 15 सदस्यांचा संघ निवडायचा आहे, त्यासाठी चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत. (2024 T20 World Cup 2024 These five players named in T20 World Cup squad Suryakumar Yadav Rinku singh Ruturaj Gaikwad Ravi Bishnoi Axar Patel )

भारतीय संघ व्यवस्थापन टी-20 फॉरमॅटमध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देत​आहे, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका पाहिल्यानंतर असे दिसते की किमान पाच खेळाडू टी-20 विश्वचषकासाठी निश्चित झाले आहेत.

‘हे’ खेळाडू संघात निश्चित

T-20 विश्वचषक 2024 साठी जवळपास निश्चित झालेल्या पाच खेळाडूंमध्ये सूर्यकुमार यादव आघाडीवर आहे, जो T-20 मध्ये नंबर वन फलंदाजदेखील आहे आणि ऑस्ट्रेलिया मालिकेत त्याने केवळ एक फलंदाज म्हणूनच नव्हे तर एक कर्णधार म्हणूनही छाप पाडली आहे. त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या संघात सामील करण्यात आले आहे. तसंच त्याला भारताविरुद्ध होणाऱ्या T-20 मालिकेसाठी कर्णधारही बनवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सूर्या 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात सहभागी होणार हे जवळपास निश्चित झाले असून, विश्वचषक स्पर्धेत तो कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.

त्याच्याशिवाय या पाच खेळाडूंमध्ये रिंकू सिंगच्या नावाचा समावेश आहे, ज्याने सलग अनेक सामन्यांमध्ये संघासाठी शानदार फिनिशरची भूमिका बजावली आहे. याच कारणामुळे त्याची दक्षिण आफ्रिका मालिकेसाठीही निवड करण्यात आली असून, तो निश्चितपणे टी-20 विश्वचषक संघाचा भाग असेल असे दिसते. त्याच्याशिवाय या यादीत ऋतुराज गायकवाडचेही नाव निश्चित झाल्याचे दिसते, कारण गायकवाडने आपल्या उत्कृष्ट सलामीच्या कौशल्याने निवड समितीसह संपूर्ण देशाला प्रभावित केले आहे. अलीकडेच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामन्यात 123 धावांची नाबाद इनिंग खेळून जगभरातून दाद मिळवली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होणाऱ्या तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेत त्याला संधी मिळाली आहे.

रोहित-विराट आणि राहुल-अय्यर यांचा 20 खेळाडूंमध्ये समावेश

याशिवाय अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई हे देखील त्या 5 खेळाडूंमध्ये आहेत, ज्यांना विश्वचषक 2024 च्या संघात निश्चितपणे स्थान मिळू शकते. आता या 20 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया ज्यातील 10 खेळाडूंना निवडकर्ते T-20 विश्वचषक खेळण्यासाठी पाठवू शकतात. या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली ही दोन मोठी नावे आहेत. तसंच, यशस्वी जैस्वाल, जितेश शर्मा, मुकेश कुमार, दीपक चहर, रोहित शर्मा, आवेश खान, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, प्रसीद कृष्णा, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, अश्विन चंद्रन , केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली.

(हेही वाचा: Virat vs Sourav : विराटच्या ‘कर्णधार’ वादावर सौरव गांगुलीचे पुन्हा स्पष्टीकरण; म्हटले… )