घरक्रीडावर्ल्डकपमध्ये पुन्हा १४ संघ? ‘सुपर सिक्स फेरी’चे पुनरागमन होण्याची शक्यता

वर्ल्डकपमध्ये पुन्हा १४ संघ? ‘सुपर सिक्स फेरी’चे पुनरागमन होण्याची शक्यता

Subscribe

हे बदल २०२७ वर्ल्डकपपासून अवलंबले जाण्याची शक्यता आहे.

इंग्लंडमध्ये झालेला २०१९ एकदिवसीय वर्ल्डकप १४ ऐवजी १० संघांमध्ये खेळवण्यात आला होता. तसेच भारतात होणाऱ्या २०२३ एकदिवसीय वर्ल्डकपमध्येही १० संघच खेळणार आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (ICC) बरीच टीका होत आहे. आयसीसीच्या या निर्णयामुळे आयर्लंड, स्कॉटलंड आणि झिम्बाब्वे यांसारख्या संघांचे नुकसान होत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आयसीसी पुन्हा एकदा नियमांत बदल करून १४ संघांना एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये प्रवेश देण्याची शक्यता आहे. तसेच वर्ल्डकपमध्ये ‘सुपर सिक्स फेरी’चेही पुनरागमन होईल अशी चर्चा आहे. हे बदल २०२७ वर्ल्डकपपासून अवलंबले जाण्याची शक्यता आहे.

१४ संघांची दोन गटांमध्ये विभागणी

सुपर सिक्स फेरी अखेरची २००३ वर्ल्डकपमध्ये झाली होती. मात्र, मागील तीन वर्ल्डकपमध्ये अव्वल संघांना फायदेशीर ठरतील असे नियम करण्यात आले होते. परंतु, २०२७ मध्ये पुन्हा सुपर सिक्स फेरीचे पुनरागमन होण्याची शक्यता आहेत. या वर्ल्डकपच्या सुरुवातीला १४ संघांची दोन गटांमध्ये विभागणी केली जाईल. प्रत्येक संघ सहा साखळी सामने खेळेल. दोन्ही गटांमधील अव्वल तीन-तीन संघ सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील.

- Advertisement -

दुसऱ्या गटातील तीन संघांविरुद्ध सामने 

सुपर सिक्स फेरीत प्रत्येक संघ दुसऱ्या गटातील तीन संघांविरुद्ध सामने खेळेल आणि या फेरीअंती अव्वल चार संघ उपांत्य फेरी गाठतील. २००३ वर्ल्डकप सुपर सिक्स फेरी पद्धतीने झाला होता. त्यावेळी केनियाला उपांत्य फेरी गाठण्यात यश आले होते. परंतु, त्यानंतर अव्वल संघांना फायदेशीर ठरतील असे नियम करण्यात आल्याने केनिया, आयर्लंड किंवा झिम्बाब्वे यांसारख्या तुलनेने दुबळ्या संघांना फारसे यश मिळवता आलेले नाही.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -