घरक्रीडाजेव्हा धोनीचा चाहता त्याच्या मागे लागला...

जेव्हा धोनीचा चाहता त्याच्या मागे लागला…

Subscribe

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-० अशा स्कोअरने आघाडीवर आहे. ODI सिरीजमधील दुसरा सामना काल नागपूर येथे पार पडला. यावेळी कॅप्टन कूल अर्थात महेंद्रसिंग धोमनीच्या एका चाहत्याने थेट ग्राऊंडवर येत एकच धमाल उडवून दिली. धोनीला भेटण्याच्या इच्छेने आलेल्या या चाहत्याने धोनीला चक्क मैदानावर पळवले. धोनी हा अनेक तरूणांच्या गळ्यातील ताईत आहे. देशभरात धोनीचा खूप मोठा चाहता वर्ग असून, अनेक चाहते तर त्याच्यासाठी अगदी काहीही करायला तयार असतात. अशाच फॅन्सपैकी एक असलेल्या या फॅनने धोनीला ग्राउंडवर धावायला भाग पाडलं. इतकंत नाही तर हा पठ्ठ्या तिथेच धोनीच्या पायादेखील पडला. धोनीसुद्धा या प्रकारामुळे काहीवेळ भारावून गेला होता. ही सगळी गंमत त्यानेही पूरेपूर एन्जॉय केली.

सौजन्य – सोशल मीडिया

भारताचा कालचा धाव २५० धावांवर आटपला. विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावार भारताने २५० धावांचा पल्ला गाठला. धोनीला मात्र या सामन्यात एकही धाव बनवता आली नाही. ज्यावेळी भारतीय संघ फिल्डींगसाठी मैदानात उतरली तेव्हा अचानक हा फॅन धावत मैदानावर आला आणि धोनीच्या मागेच लागला. धोनीच्या जर्सीचा नंबर ७ आहे. याच क्रमांकाची पांढऱ्या रंगाची जर्सी त्यानेही घातली होती. याशिवाय त्याच्या जर्सीवर THALA असे नाव लिहीले असल्यामुळे त्याचे नावच थाला असल्याचा अंदाज लावला जात आहे. दरम्यान, हा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी मैदानावरील सर्व खेळाडूंना हसू आवरले नाही. धोनीने त्याच्या चाहत्याला नाराज केले नाही. मैदानात पळापळ झाल्यानंतर धोनीने त्याला आपल्या जवळ बोलावले. यावेळी त्या धोनी भक्ताने थेट धोनीचे पाय धरले. या प्रकारामुळे धोनीही गहिवरुन गेला. सोशल मीडियावर या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

- Advertisement -
सौजन्य – सोशल मीडिया

भारताने काल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सिरीजमधील दुसरा सामना जिंकला. एकदिवसीय क्रिकेटमधीलभारताचा हा ५०० वा विजय होता. ऑस्ट्रेलियानंतर अशाप्रकारे ५०० एकदिवसीय विजयांचा टप्पा गाठणारा भारत दुसरा संघ ठरला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताने ९६३ व्या सामन्यात हा ५०० वा विजय मिळवला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -