Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs ENG : दुसऱ्या वनडेवर सट्टा; ३३ बुकींना अटक 

IND vs ENG : दुसऱ्या वनडेवर सट्टा; ३३ बुकींना अटक 

काही जण दुर्बिणीचा वापर करून सामन्यावर लक्ष ठेवून असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती.

Related Story

- Advertisement -

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी पार पडला. या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ३३ बुकींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना झाला. या मैदानाच्या जवळील गोदरेज प्रॉपर्टी, घोरडेश्वर डोंगर आणि पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलमधून सट्टेबाज बुकींना पोलिसांनी अटक केली. काही जण दुर्बिणीचा वापर करून सामन्यावर लक्ष ठेवून असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ३३ जणांना अटक केली. या अटक करण्यात आलेल्यांपैकी पाच जण मध्य प्रदेश, १३ जण हरियाणा, ११ जण महाराष्ट्र, दोघे हरियाणा, तर १-१ जण गोवा आणि उत्तर प्रदेशचा होता.

४५ लाखाचा मुद्देमाल जप्त

घोरडेश्वराच्या टेकडीवर जाऊन दुर्बिणीतून प्रत्येक चेंडूवर नजर ठेऊन प्रत्येक मिनिटाला बुकी सट्टा लावत होते. आम्ही ३३ बुकींना बेड्या ठोकल्या आहेत. हे सर्व बुकी महाराष्ट्र आणि परराज्यातील आहेत. हे आरोपी गहुंजे मैदानाजवळच रहायला होते. अटक केलेल्या बुकींकडून ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मोबाइल, लॅपटॉप, कॅमरे, दुर्बिणी, विदेशी नोटा यांचा समावेश आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

इंग्लंडची मालिकेत बरोबरी 

- Advertisement -

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी पार पडला. या सामन्यात जॉनी बेअरस्टोचे शतक (१२४) आणि बेन स्टोक्सने केलेल्या ९९ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने भारतावर ६ विकेट व ३९ चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.

- Advertisement -