घरक्रीडाआयपीएल 2023च्या लिलावात चार खेळाडू मालामाल, 15 कोटींहून अधिक रुपयांची बोली

आयपीएल 2023च्या लिलावात चार खेळाडू मालामाल, 15 कोटींहून अधिक रुपयांची बोली

Subscribe

संपूर्ण जगभरात इंडियन प्रीमिअर लीगचा मोठ्या प्रमाणात बोलबाला आहे. आयपीएल 16चा हंगाम पुढील वर्षी पार पडणार आहे. परंतु हा हंगाम सुरू होण्यापुर्वीच आयपीएल 2023ची लिलाव प्रक्रिया आज कोची येथे पार पडली. यावेळी संघांनी खेळाडूंवर पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. यावेळी आयपीएलच्या लिलावात चार खेळाडू मालामाल झाले असून त्यांच्यावर 15 कोटींहून अधिक रुपयांची बोली लागली आहे.

इंग्लंडचा सॅम करन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला 18.5 कोटी रूपयांना पंजाब किंग्जने आपल्या गोटात खेचले. यानंतर ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीवर मुंबई इंडियन्सने 17.5 कोटी रूपयांची बोली लावली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्सला 16.25 कोटी रूपये बोली लावत अजून एक धमाका केला. निकोलस पुरनला लखनौ सुपर जायंटने 16 कोटी रूपयाला खरेदी केले.

- Advertisement -

- Advertisement -

आयपीएल 2023च्या लिलावात महागडे ठरलेले खेळाडू

18.50 कोटी- सॅम करन (पंजाब किंग्स)
17.5 कोटी- कॅमरून ग्रीन (मुंबई इंडियन्स)
16.25 कोटी- बेन स्टोक्स (चेन्नई सुपर किंग्स)
16 कोटी- निकोलस पूरन (लखनऊ सुपर जायंट्स)

सॅम करन का ठरला सर्वाधिक महागडा खेळाडू?

चेन्नई सुपर किंग्ज या संघात खेळणारा सॅम आता पंजाब किंग्जकडून खेळणार आहे. पंजाबने त्याच्यावर बरेच पैसे मोजले आहेत. पंजाबने तब्बल 18.50 कोटी रुपयांना सॅमला संघात सामिल केलं आहे. सध्या सॅम करन चांगल्या फॉर्मात दिसत आहे. टी20मध्ये सॅमने दमदार कामगिरी केली होती. टी20 विश्वचषक 2022 चा ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ ठरलेला इंग्लंडचा सॅम करन याच्यावर यंदा अनेक फ्रँचायझीची नजर होती.


हेही वाचा : भारतीय संघात नसलेले दोन खेळाडू आयपीएलच्या


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -