घरक्रीडाआयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी 800चे तिकीट 8000 आणि 1500चे तिकीट 15000 रुपयांना घेण्यास...

आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी 800चे तिकीट 8000 आणि 1500चे तिकीट 15000 रुपयांना घेण्यास प्रेक्षकांची तयारी

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगचे (आयपीएल) सर्व साखळी सामने आणि क्वॉलिफायर सामनेही संपले असून, आता अंतिम सामना (Final Match) होणार आहे. येत्या रविवार 29 मे रोजी अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) हा सामना होणार आहे.

इंडियन प्रिमीयर लीगचे (आयपीएल) सर्व साखळी सामने आणि क्वॉलिफायर सामनेही संपले असून, आता अंतिम सामना (Final Match) होणार आहे. येत्या रविवार 29 मे रोजी अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) हा सामना होणार आहे. परंतु, ही आयपीएल पाहण्यासाठी स्टेडियमही हाऊसफूल असणार आहे. कारण या मेगाफायनल लढतीची ऑनलाईन तिकिटे काही तासांतच विकली गेली आहे. मात्र अनेकांना आयपीएलचा अंतिम सामना स्टेडियममध्ये बसून पाहायचा आहे, पण तिकीट उपलब्ध नसल्याने या प्रेक्षकांनी नऊपट अधिक दराने तिकीट विकत घ्यायची तयारी दर्शवल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, 800 रुपयांच्या तिकिटासाठी 8 हजार रुपये तर 1500 रुपयांच्या तिकिटासाठी 15 हजार रुपये मोजण्याचीही तयारी काहींनी दर्शवली आहे.

गुजरातमधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लाख 32 हजार इतकी आहे. त्यामुळे रविवारी अंतिम सामना पाहाण्यासाठी हे स्टेडियम संपूर्ण भरणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. विशेष म्हणजे सर्व आलिशान सोयी आणि अंतिम लढतीसह एलिमिनेटर-2 लढत पाहण्याची संधी सर्वात महागड्या 65 हजार किंमतीच्या तिकिटावर मिळणार आहे. ही सर्वात महागडी तिकिटेही काही तासांतच विकली गेल्याची माहिती मिळते. या तिकीटधारकांसाठी वेगळी केबिन, जेवण, टीव्ही सेट आणि आरामदायक सोफा पुरवला जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2022 Final : अंतिम सामन्याला पंतप्रधान मोदींसह, अमित शाह लावणार हजेरी; 6000 पोलीस तैनात

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद शहरातील सर्व लहान मोठ्या निवासी हॉटेलांचे बुकिंग आताच हाऊसफुल्ल झाले आहेत. आयपीएल फायनल बघायला येणाऱ्या प्रेक्षकांच्या मोठ्या संख्येमुळे देशातील अन्य महानगरांतून विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठीची तिकिटेही मोठ्या प्रमाणात महागली आहे. 7 हजार रुपये दैनिक भाड्याच्या डिलल्स रुमचे बुकिंग आता तब्बल 15 हजार रुपये मोजून केले जात आहेत.

- Advertisement -

गुजरात विरूद्ध राजस्थान

यंदाच्या आयपीएलच्या (IPL 2022) 15 व्या पर्वाचा अंतिम सामना नवा संघ गुजरात टायटन्स (Gujarat Tiatans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. गुजरात संघाने आयपीएलच्या साखळी सामन्यात उत्तम कामगिरी करत प्ले ऑफमध्ये पहिले स्थान मिळवले होते. तसेच, राजस्थानच्या संघानेही अशीच कामगिरी करत आणि खेळाडूंच्या योग्य सहकार्यामुळे प्ले ऑफमध्ये दुसरे स्थान पटकावले होते. त्यामुळे प्ले ऑफचा पहिला क्वॉलिफायर सामना हा गुजरात आणि राजस्थान यांच्या झाला होता. या सामन्यात गुजरातने राजस्थानला पराभूत केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा या दोन संघात लढत होणार आहे. त्यामुळे राजस्थान बदला घेत आयपीएलचे जेतेपद पटकावणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – श्रीलंकेच्या ‘या’ गोलंदाजाने घेतल्या 10 विकेट, बांगलादेशचा पराभव करत WTC मध्ये मिळवले दुसरे स्थान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -