viral video: खेळाडूंना भेटण्यासाठी चाहता मैदानात, सुरक्षारक्षकांकडून मारहाण अन् शमीने केली मध्यस्थी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात एका चाहत्याने मैदानात एन्ट्री मारली. खेळाडूंना भेटण्यासाठी भारतीय संघाचा एक चाहता थेट मैदानात घुसला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून त्याला मारहाण करण्यात आली. परंतु वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मध्यस्थी केल्यामुळे तो चाहता सुटला.

या चाहत्याने मैदानात एन्ट्री केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या चाहत्याने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ज्याप्रमाणे तो मैदानात घुसला. त्यानंतर मैदानातील सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढले. परंतु यावेळी मोहम्मद शमीने मध्यस्थी केल्याचं दिसून आलं आहे. शमीने गार्डला मारहाण करण्यापासून रोखलं आणि संबंधित चाहत्याला बाहेर जाण्यास सांगितलं.

नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एका मोठ्या आणि दमदार विजयाची नोंद केली. भारताने हा सामना 1 डाव आणि 132 धावांच्या फरकाने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता दुसरी मालिका दिल्लीत सुरू आहे. गेल्या ६ दशकांत ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय संघाचा पराभव करण्यात यश मिळालं नाही. जवळपास ६३ वर्षांत ऑस्ट्रेलिया संघाला दिल्लीत एकाही कसोटी सामन्यात भारताला हरवता आलेलं नाही. त्यामुळे आज होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कांगारू भारतीय संघाचा ६३ वर्षांचा इतिहास मोडणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : दुसऱ्या कसोटीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया दिल्लीत भिडणार, कांगारू ६३ वर्षांचा इतिहास मोडणार का?