घरक्रीडाकसोटी क्रिकेटसाठी नवी सुरुवात!

कसोटी क्रिकेटसाठी नवी सुरुवात!

Subscribe

डे-नाईट सामन्याबाबत अश्विनचे विधान

डे-नाईट सामने ही कसोटी क्रिकेटसाठी नवी सुरुवात आहे, असे मत भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने व्यक्त केले. भारतीय संघ कोलकात्याच्या ईडन गार्डन्समध्ये आपला पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना दुपारी १ वाजता सुरु होणार असून रात्री ८ पर्यंत चालणार आहे. या वेळेमुळे चाहते स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी येतील असे अश्विनला वाटते.

डे-नाईट सामने ही कसोटी क्रिकेटसाठी नवी सुरुवात आहे. या सामन्यांमुळे चाहते स्टेडियममध्ये येतील आणि कसोटी क्रिकेटचा आनंद घेतील अशी मला आशा आहे. हा सामना ज्या वेळेत होणार आहे ते पाहता, चाहत्यांना त्यांचे काम संपवून स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळेल, असे अश्विन म्हणाला.

- Advertisement -

अश्विनचा भारतीय संघातील सहकारी मोहम्मद शमीने या सामन्याविषयी सांगितले, गुलाबी चेंडूचा सामना करताना दुसर्‍या सत्रात फलंदाजांना जास्त लक्ष देऊन खेळावे लागेल. ईडन गार्डन्सवर चेंडू जास्त स्विंगही होईल.

अश्विनचे पुनरागमन व्हावे – हरभजन

रविचंद्रन अश्विनचे भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात पुनरागमन झाले पाहिजे, असे विधान हरभजन सिंगने केले. तुम्हाला टी-२० क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या षटकांत फिरकीपटूचा वापर करायचा असल्यास तुम्ही अश्विनला का संधी देत नाही? त्याने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. वॉशिंग्टन सुंदरला अजून शिकण्याची गरज आहे. त्यामुळे अश्विनचे मर्यादित षटकांच्या संघात पुनरागमन झाले पाहिजे, असे हरभजन म्हणाला. अश्विनने आपला अखेरचा टी-२० आणि एकदिवसीय सामना जुलै २०१७ मध्ये खेळला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -