हद्द झाली! धोनीच्या मुलीला सोशल मीडियावरून बलात्काराची धमकी

काही व्यक्तींनी क्रिकेटपटूंवर टीका करताना सर्व मर्यादाच सोडल्याची उदाहरणे समोर येत आहेत.  

ms dhoni and ziva
महेंद्रसिंग धोनी आणि त्याची मुलगी झिवा  

क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ. भारतामध्ये क्रिकेट हा फक्त खेळ नसून जणू धर्मच झाला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंकडून चाहत्यांना खूप अपेक्षा असतात आणि या अपेक्षा पूर्ण न झाल्यास क्रिकेटपटूंना ट्रोल केले जाते. भारतीय क्रिकेटपटूला एखाद्या सामन्यात चांगली कामगिरी करता न आल्यास त्याच्यावर टीका होणार हे ठरलेलेच असते. मात्र, आता काही टीकाकारांनी सर्व मर्यादाच सोडल्याची उदाहरणे समोर येत आहेत. सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश येत आहे. खासकरून संथ फलंदाजीमुळे त्याच्यावर बरीच टीका होत आहे.

इंस्टाग्राम अकाऊंटवर दिली धमकी 

चेन्नईचा बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामना झाला. या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना १६७ धावा केल्या आणि याचा पाठलाग करताना चेन्नईला १५७ धावाच करता आल्या. या सामन्यात धोनीला १२ चेंडूत केवळ ११ धावाच करता आल्या. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर बरेच ट्रोल केले गेले. मात्र, खेळाडूंना ट्रोल करताना, त्यांच्यावर टीका करताना त्यांच्या कुटुंबियांवरही निशाणा साधला जात असल्याचे वारंवार पाहायला मिळत आहे. त्यांना अपशब्द बोलले जातात. आता एका व्यक्तीने धोनीवर टीका करताना सर्वच मर्यादा सोडत धोनीची पाच वर्षीय मुलगी झिवावर बलात्कार करण्याची धमकी दिली. त्याने ही धमकी धोनी, तसेच त्याची पत्नी साक्षीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कॉमेंट करत दिली आहे.

tweet