घरक्रीडापंतसारखा खेळाडू संघात असायला हवा

पंतसारखा खेळाडू संघात असायला हवा

Subscribe

विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघात युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला स्थान मिळाले नाही, याचे दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला आश्चर्य वाटले. पंतने आतपर्यंत केवळ ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने २३.२५ च्या सरासरीने ९३ धावा केल्या आहेत. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतके केली होती. त्यामुळे पंतसारखा खेळाडू संघात असायलाच हवा असे पॉन्टिंगचे मत आहे.

पंतची विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली नाही, याचे मला आश्चर्य वाटले. मला वाटले होते की त्याची संघात निवड होईल आणि तो अंतिम ११ खेळाडूंमध्येही असेल. त्याच्यासारखा खेळाडू संघात असायला हवा. माझ्या मते त्याच्यात चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळून सामना जिंकवण्याची क्षमता आहे आणि हाच भारत व इतर संघांमधील फरक असता. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भारतात खूप प्रतिभावान फलंदाज आहेत. पंतची या विश्वचषकासाठी निवड झाली नसली तरी त्याच्यासारखा खेळाडू कारकीर्द संपण्याआधी किमान तीन विश्वचषक खेळला नाही तर मला खूप आश्चर्य वाटेल, असे पॉन्टिंग म्हणाला.

- Advertisement -

विश्वचषकासाठी निवड न झाल्याचे कळल्यावर पंतची काय प्रतिक्रिया होती असे विचारले असता पॉन्टिंगने सांगितले, मी त्याच्याशी चर्चा केली होती आणि त्याने ती वेळ योग्यप्रकारे हाताळली. त्याला संघात स्थान मिळाले नाही याबाबत तो नक्कीच निराश होता. त्याला विश्वचषकात खेळायचे होते. मात्र, त्याला अजूनही तीन-चार विश्वचषक खेळण्याची संधी मिळू शकेल हे त्याने लक्षात ठेवायला हवे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -