Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2023 GT vs MI : गुजरात आणि मुंबईमध्ये आज होणार प्रतिष्ठेचा...

IPL 2023 GT vs MI : गुजरात आणि मुंबईमध्ये आज होणार प्रतिष्ठेचा सामना, कोण मारणार बाजी?

Subscribe

आयपीएल २०२३ च्या १६ व्या हंगामात आज गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यात क्वालिफायर-२ चा सामना पार पडणार आहे. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हे आमनेसामने येणार आहेत. मुंबईचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. तर हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सची धुरा सांभाळणार आहे. त्यामुळे या सामान्यात कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबईने एलिमिनेटरमध्ये कृणाल पंड्याच्या लखनऊ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवत क्वालिफायर-२ मध्ये धडक दिली. तर क्वालिफायर-१ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने पराभूत केलं आहे. आता गुजरातला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी आणखी एक संधी आहे. त्यामुळे गुजरात आणि मुंबईमध्ये आज करो वा मरो ची स्थिती आहे. कारण यापैकी जो संघ सामना जिंकेल तो थेट अंतिम फेरीत धडक देणार आहे.

- Advertisement -

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर ७ वाजता टॉस होणार आहे.

असे असतील दोन्ही उभय संघ –

मुंबई इंडियन्स टीम – रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, ख्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर.

- Advertisement -

गुजरात टायटन्स टीम – हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.


हेही वाचा : ‘या’ लीग क्रिकेटसाठी जेसन रॉय इंग्लंड बोर्डाचा करारावर मारणार लाथ?


 

- Advertisment -