Eco friendly bappa Competition
घर क्रीडा महिला प्रीमियर लीगच्या पहिल्याच हंगामात आरसीबीच्या नावे विक्रम, पण...

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्याच हंगामात आरसीबीच्या नावे विक्रम, पण…

Subscribe

मुंबई : रॉयल चॅलेंजर बेंगलोर (आरसीबी) आणि मुंबई इंडियन्स संघामध्ये पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने १४.२ षटकात आरसीबीने दिलेले आव्हान पूर्ण केले आणि या लीगमधील दुसरा सामना जिंकला. याआधी आरसीबीने १५५ धावा केल्या, पण त्यांनी आपल्या नावावर या पहिल्या हंगामातील वाईट विक्रम केला.

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामातील चौथा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियम खेळला गेला. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर स्मृती मानधनाने आक्रमक फटकेबाजी करत पहिल्या चार षटकात धावसंख्या 35 पर्यंत पोहचवली. तिला दुसऱ्या बाजूने सोफी डिवाईन हिने चांगली साथ दिली. त्यामुळे या सामन्यात आरसीबी मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असताना पॉवरप्लेच्या शेवटच्या दोन षटकात सगळं चित्र बदललं. मुंबईची डावखुरी फिरकी गोलंदाज सैकी इशाकने पाचव्या षटकात 16 धावांवर डिवाईनला बाद केले. त्यानंतर त्याच षटकात तिने दिशा कसातला शुन्यावर बाद करत आरसीबीला दुसरा धक्का दिला.

- Advertisement -

आरसीबीच्या दोन विकेट पडल्यानंतर हेथर नाईट स्मृती मानधनाला साथ देण्यासाठी क्रीजवर आली. स्मृती मानधनाने 17 चेंडूत 23 धावा करत चांगली सुरूवात केली होती, मात्र सहाव्या षटकात हेली मॅथ्यूजने आरसीबीला पुन्हा दोन धक्के दिले. स्मृती आक्रमक फटकेबाजी करण्याच्या नादात झेलबाद झाली, तर हेथर नाईटचा मॅथ्यूजने शुन्यावर त्रिफळा उडवला.
आरसीबीच्या चार विकेट पडल्यानंतर अनुभवी एलिस पेरी आणि युवा रिचा घोष यांनी आरसीबीचा डाव आक्रमकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या दोघींनी दोन षटकात 28 धावांची भागीदारी रचत संघाला 9 व्या षटकात 71 धावांपर्यंत पोहचवले. मात्र पेरी 7 चेंडूत 13 धावा करून बाद झाली.

आरसीबीचा निम्मा संघ बाद झाल्यानंतर रिचा घोष आणि कनिका अहुजा या युवा जोडीने डाव सावरत 12 षटकात आरसीबीला १०० धावांपर्यंत पोहचवले. मात्र मुंबईच्या अनुभवी पूजा वस्त्रकारने 13 चेंडूत 22 धावा करणाऱ्या कनिका अहुजाला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर रिचा देखील 25 चेंडूत 28 धावा करून बाद झाली.

- Advertisement -

आरसीबीच्या ७ विकेट पडल्यानंतर श्रेयांका पाटीलने मेगन स्कॉट्सच्या साथीने आरसीबीला 150 च्या जवळ पोहचवले. मात्र श्रेयांकाही 15 चेंडूत 23 धावा करून बाद झाली. यानंतर आरसीबीचा डाव 155 धावात संपुष्टात आला. मुंबईकडून हेले मॅथ्यूजने 3 तर सैका इशाक आणि एमेलिया केर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे रॉयल चॅलेंजर बेंगलोर ही महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामातील पहिल्या डावात सर्वबाद होणारा पहिला संघ ठरला.

आरसीबीकडून मिळालेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून सलामीवीर हेली मॅथ्यूज व यास्तिका भाटियाने 45 धावांची सलामी दिली. भाटिया बाद झाल्यानंतर मॅथ्यूज व नॅट सिव्हर-ब्रंट यांनी मुंबईची आणखी विकेट पडू दिली नाही. या दोघींनी अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. मॅथ्यूजने 38 चेंडूवर नाबाद 77 व सिव्हरने 29 चेंडूवर नाबाद 55 धावा केल्या. या विजयासह मुंबईने दुसरा सामना जिंकला आणि गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली.

- Advertisment -