नवी दिल्ली : आशिया चषकासाठी भारतीय संघ काल जाहीर करण्यात आला आहे. या संघनिवडीनंतर माजी क्रिकेटपटू आप-आपली मते व्यक्त करीत आहेत. दरम्यान भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर यानेही आपले मत व्यक्त केले असून, टीम इंडियामध्ये कमीत कमी दोन फिरकीपटू असायला हवे असे परखड मत त्याने व्यक्त केले आहे. गंभीरच्या या वक्तव्यानंतर निवड समिती मात्र चांगलीच ‘गंभीर’ अवस्थेत दिसत आहे.(A team for the Asia Cup should have at least two spinners; Gautam Gambhir’s statement is being discussed)
भारतात यंदा एकदिवशीय क्रिकेट विश्वकपाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याआधी मात्र, आशिया चषकही पार पडणार आहे. आशिया चषकासाठी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा केली. यामध्ये तिलक वर्माला स्थान देण्यात आले आहे तर दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे संघात पुनरागमन झाले आहे. तर भारताची सलामीवर असलेला शिखर धवनला मात्र, या संघात स्थान देण्यात आले आहे.
हेही वाचा : लुना-25 क्रॅश झाल्याचे कारण आले समोर; रशिया म्हणते – अपयशातून जे शिकलो होतो ते विसरलो…
गौतम गंभीरने व्यक्त केले परखड मत
आशिया चषकासाठी निवडलेल्या संघावर बोलताना माजी खेळाडू गौतम गंभीर याने परखड मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, निवडकर्त्यांचे अभिनंदनच परंतू स्पीचचा विचार करता संघात एक नव्हे तर किमान दोन तरी फिरकीपटू असायला हवे होते. एकुणच गौतम गंभीर याचे हे मत म्हणजे युझवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई या दोन्ही संघी दिली जाऊ शकली असती कारण त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. तर मोहम्मद शमीला संघातून विश्रांती दिली असती. गौतमने असे म्हणत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.
हेही वाचा : Asia Cup India Squad : आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर, तिलक वर्माला संधी, तर ‘हा’ खेळाडू बाहेर
अस असणार आशिया चषकासाठी भारतीय संघ
निवड समितीने निवडलेल्या संघामध्ये कर्णधार म्हणून रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे.