घरक्रीडाइंग्लंड वि. पाकिस्तानच्या कसोटी सामन्यात महिलेचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

इंग्लंड वि. पाकिस्तानच्या कसोटी सामन्यात महिलेचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू असून या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीत खेळवला जात आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या ४ फलंदाजांनी शतक झळकावून खळबळ उडवून दिली दिली. शतकांच्या जोरावच इंग्लंडने कसोटीच्या पहिल्याच ५०० हून अधिक धावा केल्या.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू असून या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीत खेळवला जात आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या ४ फलंदाजांनी शतक झळकावून खळबळ उडवून दिली दिली. शतकांच्या जोरावच इंग्लंडने कसोटीच्या पहिल्याच ५०० हून अधिक धावा केल्या. एकिकडे इंग्लंडच्या फलंदाजांनी सामन्यात धावांचा पाऊस पाडत चाहत्यांचे लक्ष वेधले होते तर, दुसरीकडे एका महिलेनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या महिलेचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (a women wear saree dancing on roof in Pakistan vs England Rawalpindi test match video viral)

या व्हायरल व्हिडीओमध्ये स्टेडियमच्या बाहेर एक साडी नेसलेली महिला टेरेसवर डान्स करताना दिसली. ही महिला ज्या पद्धतीने नृत्यात तल्लीन झाली होती, ते पाहून समालोचकांनाही आनंद झाला. पण ही महिला कोण आहे, ती काय करते, हे अद्याप समजू शकलेले नाही. कॅमेरामनने आपला कॅमेरा या महिलेवर फोकस करताच समालोचकही ‘वाह! किती सुंदर दृश्य आहे. अशी कमेंट केली.

- Advertisement -

या सामन्यात कर्णधार बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघाने ११२ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी कसोटी सामन्यात एका दिवसात ४९४ धावा झाल्या होत्या. हा विक्रम ऑस्ट्रेलियन संघाने १९१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला होता. मात्र, इंग्लंडच्या संघाने पहिल्या दिवशी ७५ षटकांत ५०६ धावा ठोकल्या. सलामीवीर जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप आणि हॅरी ब्रूक यांनी शतके झळकावली.


हेही वाचा – ठरलं! आयपीएलचा लिलाव ‘या’ तारखेला होणार; 991 खेळाडूंवर लागणार बोली

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -