येत्या काळात एकाच वर्षात दोन वेळा आयपीएल?, ‘या’ खेळाडूने दिला खास प्लॅन

दरवर्षी आयपीएलच्यापूर्वी (Indian Premier League) क्रिकेटप्रेमींमध्ये आयपीएल आणि संघाची चर्चा रंगते. आयपीएलचा हंगामा सुरू होण्यापूर्वी चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. अशातच क्रिकेट प्रेमींच्या आनंदात आता आणखी वाढ होणार आहे.

दरवर्षी आयपीएलच्यापूर्वी (Indian Premier League) क्रिकेटप्रेमींमध्ये आयपीएल आणि संघाची चर्चा रंगते. आयपीएलचा हंगामा सुरू होण्यापूर्वी चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. अशातच क्रिकेट प्रेमींच्या आनंदात आता आणखी वाढ होणार आहे. कारण येत्या काळात एकाच वर्षात दोनवेळा आयपीएलचे आयोजन करता येईल, असा अंदाज भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने वर्तवला आहे.

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट (Cricket) लीग असून या आयपीएलबाबत अनेक दिग्गज खेळाडू चर्चा करत असतात. अनेक माजी खेळाडू हे सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून चर्चा करत आपला अंदाज वर्तवत असतात. तसेच काही बदल व्हावे यासाठी मत व्यक्त करत असतात. याच खेळाडूंमध्ये आता भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानेही (Aakash Chopra) महत्वपूर्ण मत व्यक्त केले आहे. आकाश चोप्राने लवकरच वर्षातून दोन आयपीएल पाहायला मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे आणि ते निश्चित आहे.

आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर (YouTube Channel) बोलत असताना त्याने आयपीएलबाबत भविष्यवाणी केली आहे. शिवाय “गेल्या काही काळात आयपीएलमध्ये बरेच बदल झाले आहेत. त्यावरून असे दिसून येते की आयपीएल आणखी पुढे गेली आहे. हे अचानक घडणार नाही ५ वर्षे लागू शकतात, परंतु मला वाटते की ते नक्कीच होईल”, असे त्याने म्हटले.

दरम्यान, वर्षभरात दोन आयपीएल खेळवण्याचा विचार केल्यास वर्षभरात कसे आयोजन करायचे याचेही उत्तर आकाश चोप्राने दिले. “आता आयपीएलमध्ये १० संघ आहेत, त्यामुळे सामन्यांची संख्या आपोआप वाढेल. आयपीएल मोठ्या फॉरमॅटमध्ये असेल ज्यामध्ये ९४ सामने असू शकतात, तर आयपीएल लहान असेल जिथे संघ एकमेकांविरुद्ध फक्त एकच सामना खेळत असतील, हे छोटे आयपीएल एका महिन्यात संपू शकते.”, असे त्याने सांगितले.


हेही वाचा – French Open 2022 : राफेल नदालने घडवला इतिहास, कॅस्पर रुडचा पराभव करत २२व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी