घरक्रीडाIPL मध्ये कोरोनाची एन्ट्री, प्रसिद्ध समालोचक कोविड पॉझिटिव्ह

IPL मध्ये कोरोनाची एन्ट्री, प्रसिद्ध समालोचक कोविड पॉझिटिव्ह

Subscribe

आयपीएल २०२३च्या १६व्या हंगामाला सुरूवात झाली आहे. जवळपास सात ते आठ आयपीएलचे सामने पूर्ण झाले आहेत. मात्र, आयपीएल सुरू होऊन आठवडा झाला नाही, तोपर्यंत कोरोनाने एन्ट्री केली आहे. प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. आकाश चोप्रा यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे.

कोरोनाची लागण झाल्यामुळे आकाश चोप्रा पुढील काही दिवस आयपीएल समालोचनापासून दूर असतील. कोरोनाची लागण झाल्यामुळे आकाश चोप्रा विलगीकरणात आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस ते आयपीएल २०२३मध्ये कॉमेंट्री करताना दिसणार नाहीत. आकाश चोप्रा आयपीएल २०२३साठी हिंदीमधून कॉमेंट्री करत आहेत.

- Advertisement -

पोस्टमध्ये आकाश चोप्रा यांनी काय म्हटलंय?

आकाश चोप्रा यांनी ट्वीट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये चोप्रा म्हणाले की, पुन्हा एकदा मला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. थोडीफार लक्षणं आहेत. काळजी करण्याचे कारण नाही. पण पुढील काही दिवस कॉमेंट्रीपासून दूर असेल. लवकरच पुनरागमन करेन, असं आकाश चोप्रा यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

आकाश चोप्रा हे हिंदीमधील प्रसिद्ध समालोचक आहेत. आयपीएल २०२३साठी आकाश चोप्रा जिओ सिनेमासाठी कॉमेंट्री करत आहेत. याआधी स्टारसोबत ते कॉमेंट्री करत होते. आकाश चोप्रा माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत.


हेही वाचा : DC vs GT: दिल्ली सामन्यासाठी पंत मैदानावर परतणार! मात्र ‘या’ गोष्टीसाठी बीसीसीआयने दिल्ली कॅपिटल्सला फटकारले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -