घरक्रीडाIPL 2022: एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेलची 'आरसीबी'च्या Hall of Fame मध्ये निवड

IPL 2022: एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेलची ‘आरसीबी’च्या Hall of Fame मध्ये निवड

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगमधील (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिग्गज खेळाडू ए.बी. डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांचा सन्मान केला आहे.

इंडियन प्रिमीयर लीगमधील (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिग्गज खेळाडू ए.बी. डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांचा सन्मान केला आहे. बंगळुरीच्या संघाने डिव्हिलियर्स आणि गेल यांचा ‘आरसीबी फ्रँचायझी हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच बंगळुरूने हॉल ऑफ फेम समावेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलमध्ये प्रथमच हॉल ऑफ फेमची प्रथा सुरू केली आहे. आयपीएलमध्ये प्रथमच एखाद्या फ्रँचायझीने असा उपक्रम राबवला आहे. आयपीएलमधील दोन दिग्गज म्हणून या दोघांची ओळख आहे आणि त्यांचा फॅन फॉलोअर्सची प्रचंड आहे.

- Advertisement -

डिव्हिलियर्स आणि गेल व्हिडिओ कॉलद्वारे कनेक्ट झाले होते. बंगळुरूने याबाबतचा एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये डिव्हिलियर्सने म्हटले आहे की, “आरसीबी हॉल ऑफ फेममध्ये आपला समावेश केल्याने आपण भावूक झालो आहोत, तसेच, या खेळाडूंसोबत बसायला मिळणं हे मोठे सौभाग्याचे आहे. खरे सांगायचे तर मी खूप भावनिक झालो आहे. तुम्हाला माहिती आहेच की मी क्रिकेटपासून थोडासा दूर आहे. मात्र, तुम्हाला टीव्हीवर पाहून उत्‍साहित होत असतो आणि हा आयपीएलचा मोसम आरसीबीसाठी विषेश ठरेल.”, असे त्याने म्हटले.

ख्रिस गेलने “सर्वप्रथम आपला हॉल ऑफ फेममध्ये समावेश केल्याबद्दल बंगळुरू फ्रँचायझीचे आभार मानले. तसेच, मी प्रत्येक गोष्टीसाठी आरसीबी फ्रँचायझीचे आभार मानू इच्छितो. माझ्यासाठी हे खरोखरच खूप खास आहे. मी आरसीबीला नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवेन”, असे ख्रिस गेलने म्हटले.

- Advertisement -

एबी डिव्हिलियर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून 157 सामन्यांत 41.10 च्या सरासरीने 4522 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतकं आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. तसंच, ख्रिस गेलने 91 सामन्यांत 43.29 च्या सरासरीने 3420 धावा केल्या आहेत आणि त्यात 5 शतकं व 21 अर्धशतकं आहेत.

बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने या दोघांचेही आभार मानले. “तुम्हा दोघांना हा सन्मान मिळणे, हा माझ्यासाठी खूप महत्वाचा क्षण आहे. तुम्ही आयपीएलचे रुप कसे बदलले हे आम्ही पाहिले. मी एबीडीसोबत ११ वर्ष खेळलो आहे. शिवाय, गेलसोबत 7 वर्ष या दोघांसोबतचा प्रवास 2011मध्ये सुरू झाला आणि ते वर्ष माझ्यासाठी खूप खास आहे.”, असं त्याने म्हटले.


हेही वाचा – ‘कर्णधार तुमच्या घरचा शिपाई नाही’; कोलकाता संघाच्या कोचवर पाकिस्तानचा ‘हा’ क्रिकेटपटू संतापला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -