घरक्रीडाABD is back : एबी डिव्हिलियर्स आरसीबीच्या संघात करणार पुनरागमन

ABD is back : एबी डिव्हिलियर्स आरसीबीच्या संघात करणार पुनरागमन

Subscribe

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (royal challengers bangalore) संघाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेचा (south africa) स्टार खेळाडू आणि मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स (ab de villiers) आरसीबीच्या संघात पुनरागमन करणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (royal challengers bangalore) संघाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेचा (south africa) स्टार खेळाडू आणि मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स (ab de villiers) आरसीबीच्या संघात पुनरागमन करणार आहे. आयपीएलच्या आगामी (IPL 2023) पर्वासाठी आपण उपलब्ध असल्याचे एबी डिव्हिलियर्सने म्हटले. परंतु, एबीडी हा खेळाडू म्हणून मैदानात उतरणार की मेण्टॉर किंवा प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे एबी डिव्हिलियर्स पुन्हा मैदानात पाहण्यासाठी आरसीबीच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यूवी स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत एबी डिव्हिलियर्सने पुनरागमन करणार असल्याचे म्हटले. यावेळी त्याने, “पुढील वर्षी आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज असून मी खूप उत्साही आहे. विराट कोहलीला मी ही आनंदाची गोष्ट सांगितली. मी नेमक्या कोणत्या भूमिकेत असेल याबाबत अद्याप काहीच ठरवलेले नाही. मात्र, पुढील वर्षी मी आयपीएलमध्ये दिसेन, हे नक्की. मी या सर्वांना खूप मिस केले. बेंगळुरूचे चिन्नास्वामी मैदान माझ्यासाठी दुसऱ्या घरासारखेच आहे. चिन्नास्वामी स्टेडियम पूर्ण प्रेक्षक क्षमतेने भरलेले मला पाहायचेय”, असे एबी डिव्हिलियर्स म्हणाला.

- Advertisement -

हेही वाचा – Ab de Villiers Retiremen : एबी डिव्हिलियर्सच्या राजीनामा, अन् कोहली झाला भावूक

एबी डिव्हिलियर्सने आयपीएल 2022 च्या (Indian Premier league) अगोदर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमींसह आरसीबीच्या (RCB) चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याच्या निवृत्तीनंतर आयपीएल 2022मध्ये आरसीबीच्या संघात त्याच्याजागी दिनेश कार्तिकला घेण्यात आले.

- Advertisement -

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून एबी डिव्हिलियर्सने 157 सामन्यांत 41.10च्या सरासरीने 4522 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे.

आरसीबी फ्रँचायझी हॉल ऑफ फेम

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिग्गज खेळाडू ए.बी. डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांचा सन्मान केला आहे. बंगळुरीच्या संघाने डिव्हिलियर्स आणि गेल यांचा ‘आरसीबी फ्रँचायझी हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच बंगळुरूने हॉल ऑफ फेम समावेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलमध्ये प्रथमच हॉल ऑफ फेमची प्रथा सुरू केली आहे. आयपीएलमध्ये प्रथमच एखाद्या फ्रँचायझीने असा उपक्रम राबवला आहे. आयपीएलमधील दोन दिग्गज म्हणून या दोघांची ओळख आहे आणि त्यांचा फॅन फॉलोअर्सची प्रचंड आहे.


हेही वाचा – French Open 2022 : नदालने मोडीत काढला रॉजर फेडररचा विक्रम, एकाच ग्रँडस्लॅममध्ये सर्वाधिक सामन्यांत विजयी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -