AB de Villiers retires : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

टी-२० लीग्समध्ये डिव्हिलियर्सचा सहभाग...

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने निवृत्तीबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृ्त्तीची घोषणा केलीय. दक्षिण आफ्रिकेसाठी डिव्हिलियर्स २०१८ साली मैदानात उतरला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहूनही तो सतत जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळताना दिसत होता. डिव्हिलियर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्याने गुडबाय म्हणत धन्यवाद देखील म्हटलं आहे.

काय म्हटलंय एबी डिव्हिलियर्सने ?

माझ्यासाठी हा प्रवास खूप अविश्वसनीय होता. परंतु मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा मोठा निर्णय घेतलाय. मी माझ्या मोठ्या भावांसोबत अंगणात सामने खेळलो आहे. तसेच खूप उत्साहाने मी हा खेळ खेळलो. आता मी ३७ वर्षांचा झालो आहे. त्यामुळे ज्योत तितकी तेजस्वीपणे जळत नाहीये. अशा प्रकारचं भावनिक ट्विट एबी डिव्हिलियर्सने केलं आहे. तसेच त्याने फोटो शेअर करत धन्यवाद असं लिहिलं आहे.

टी-२० लीग्समध्ये डिव्हिलियर्सचा सहभाग

दक्षिण आफ्रिकेचा सर्वात तगडा आणि उत्साहीत खेळाडू एबी डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच संपूर्ण जगभरातील चाहत्यांना त्याने ट्विट मधून मोठा धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आयपीएलमध्ये एबीने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. तसेच आयपीएल व्यतिरिक्त स्पार्टंस, रंगपूर रायडर्स, मिडलसेक्स, ब्रिस्टन हीट आणि लाहोर कलंदर्ससाठी फ्रंचायजी क्रिकेट खेळला आहे.

डिव्हिलियर्सने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ११४ कसोटी सामने, २२८ एकदिवसीय सामने आणि ७८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये एबी डिव्हिलियर्सचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ४७ शतकं झळकावली आहेत.

कोहलीला मोठा झटका

एबी डिव्हिलियर्सच्या दिग्गज खेळाडूने निवृत्ती घेतल्यानंतर आरसीबीला मोठा झटका बसला आहे. डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये १८४ सामन्यांमध्ये ३९.७१ सरासरीपेक्षा ५ हजार १६२ धावा काढल्या आहेत. तर डिव्हिलियर्सचा स्ट्राईक रेट १५१ धावांच्या संख्येपेक्षापण जास्त आहे. त्याच्या फलंदाजी पाहिली असता ३ शतकं आणि ४० अर्धशतकं झळकावली आहेत.