AB de Villiers returns to cricket मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) असो अथवा आंतरराष्ट्रीय सामने असोत. अनेक खेळाडू हे नेहमीच क्रिकेटप्रेमींच्या चर्चेत असतात. त्यापैक एक खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलिर्स. एबी डिव्हिलिर्सला संपूर्ण क्रिकेटविश्वात Mr. 360 म्हणून ओळखलं जात. आपल्या फलंदाजीवेळी मैदानाच्या चहुबाजुला फटकेबाजी करण्यात एबी डिव्हिलिर्स अग्रेसर आहे. मात्र, निवृत्तीनंतर अनेक क्रिकेटप्रेमींनी निराशा व्यक्त केली. परंतु, आता या क्रिकेटप्रेमींचं निराशा दूर होणार आहे. कारण Mr. 360 एबी डिव्हिलिर्स पुन्हा क्रिकेटच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलिर्स चार वर्षांनंतर पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. वर्ल्ड चॅम्पियन्सशीप लेजेंड्स (WCL) स्पर्धेत एबी डिव्हिलिर्स पुन्हा मैदानावर फटकेबाजी करताना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत एबी गेम चेंजर्स दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व करणार आहे.
AB de Villiers is back ❤️
He’ll play for South Africa Champions in WCL starting in July pic.twitter.com/fMAADSRWJ0— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) January 28, 2025
आपल्या पुनरागमनाबाबत एबी डिव्हिलिर्सने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टिकरण दिले आहे. त्यानुसार, “मी चार वर्षांपूर्वी क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. कारण मला त्यावेळी आणखी खेळण्याची इच्छा नव्हती. पण आता वेळ निघून गेली. माझ्या मोठ्या मुलानं खेळायला सुरूवात केली आहे. आम्ही बागेत अधिकाधिक वेळा खेळत असतो. त्यामुळे मला आता पुन्हा खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल बरं वाटत आहे. यासाठी मी पुन्हा जिम आणि नेटकडे वळणार आहे”, असे एबी डिव्हिलिर्स म्हणाला.
हेही वाचा – Ranji Trophy : रोहित, पंत आऊट अन् विराट इन; रणजी ट्रॉफीत कोहलीचं पुनरागमन